खुशखबर ! मोदी सरकारकडून 12 वी पास विद्यार्थ्यांना ‘स्कॉलरशिप’, 31 ऑक्टोबर अर्जाची अंतिम तारीख, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर आपण एखाद्या कोर्समध्ये प्रवेश घेतला असेल तर, तुम्हाला 10 ते 20 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळण्याची संधी आहे. केंद्र सरकारच्या मध्यवर्ती क्षेत्र शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. यासाठी शेवटची तारीख 31 ऑक्टोबर आहे. ही शिष्यवृत्ती देशभरातील 82 हजार (41 हजार विद्यार्थी, 41 हजार मुली) विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 25 वर्षे असावे. अर्जदाराचा संबंधित मंडळाच्या 80 टक्के मध्ये समावेश असणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीमध्ये एससीला 15 टक्के, एसटीला 7.5 टक्के, ओबीसीला 27 टक्के आणि दिव्यांगांना 5 टक्के आरक्षण मिळेल.

किती मिळणार शिष्यवृत्ती
अंडर ग्रेजुएट कोर्समध्ये सलग तीन वर्षे 10 हजार रुपये वर्षाला आणि पोस्ट ग्रेजुएट कोर्समध्ये दोन वर्षांपर्यंत 20 हजार रुपये वर्षाला असा पद्धतीने स्कॉलरशिप देण्यात येणार आहे.

महतवाची बाबा
ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे तोच विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरू शकतो.

जुन्या शिष्यवृत्तीचे होणार नावीनीकरण
आधी स्कॉलरशिप मिळवलेले विद्यार्थी देखील या नवीन स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतात. या मध्ये त्यांना मागील वर्षी कमीत कमी 60 % गुण मिळालेले असणे गरजेचे आहे त्याबरोबरच 75 % त्यांची हजेरी असणे देखील आवश्यक आहे आणि त्या विद्यर्थ्यावर रॅगिंग सारखे आरोप नसावेत.

कोणत्या बोर्डात किती विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती
सीबीएसई : 5413, आईसीएसई : 577, आंध्र प्रदेश : 3527, अरुणाचल प्रदेश : 77, आसाम : 2002, बिहार : 5624, छत्तीसगढ : 1387, दिल्ली : 1162, गोवा : 113, गुजरात : 3944, हरियाणा : 1591, हिमाचल : 461, जम्मू कश्मीर : 768, झारखंड : 1878, कर्नाटक : 4237, केरळ : 2324. महाराष्ट्र : 7417, मध्य प्रदेश : 4299, मणिपुर : 181, मेघालय : 166, मिजोरम : 75, नागालॅंड : 176, उडिसा : 2736, पंजाब : 1902, राजस्थान : 3978, सिक्किम : 44, तमिळनाडु : 4883, तेलंगाना : 2570, त्रिपुरा : 236, उत्तर प्रदेश : 11460, उत्तराखंड : 616, पश्चिमी बंगाल : 5941, अंदमान : 31, चंडीगढ : 82, दादरा : 21, दमन : 19, लक्षद्वीप : 04, पाॅंडेचेरी : 78

असा करा अर्ज
शिष्यवृत्तीच्या वेबसाईटवर जावे लागेल त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ हायर एजुकेशन वर क्लिक करा. त्यानंतर सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ स्कॉलरशिप फॉर कॉलेज एंड यूनिवर्सिटी स्टूडेंट्सवर क्लीक करा. याठिकाणी शिष्यवृत्ती बाबतची सर्व माहिती पाहता येईल त्यानंतर होमपेजवरील न्यू रजिस्ट्रेशन वर क्लीक करा आणि जर अधीच रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर लॉगिन करून अर्ज भरू शकता.

Visit : Policenama.com