बारामतीत भाजपच्या महिला खासदाराविरोधात पोलिसात अर्ज दाखल !

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) यांच्या विरोधात बारामतीत ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी अतिरीक्त पोलीस अधीक्षकांना अर्ज देण्यात आला आहे. बारामतीमधील सीआर संघटनेचे उपाध्यक्ष चेतन कुचेकर यांनी हा अर्ज दिला आहे.

या अर्जात नमूद केलं आहे की, 12 डिसेंबर रोजी मध्य प्रदेशातील सिहोर येथे आयोजित एका संमेलनात त्यांनी चातुर्वण्य व्यवस्थेचे समर्थन करताना 4 वर्गांचा हवाला दिला होता. हे वक्तव्य करताना त्यांनी जी शब्दरचना सार्वजनिक ठिकाणी वापरली त्यामुळं दलित समाजाचा अपमान झाला आहे. त्यांचं वक्तव्य जातीयवादाला खतपाणी घालणारं असून राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण करणारं आहे असंही याता म्हटलं आहे.

इतकंच नाही तर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर खासदार आहेत. त्यांचं अनुकरण आणि समर्थन करणारे अनेक लोक आहेत. त्यांनी जर असं वक्तव्य केलं तर याचा परिणाम समाजव्यवस्थेवर होऊ शकतो.

कुचेकर यांनी 19 डिसेंबर रोजी खा. ठाकूर यांचा व्हिडीओ एएनआयच्या ट्विटरवर पाहिला. यानंतर त्यांनी तक्रार दिसली आहे आणि याचा गांभीर्याचा विचार करून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर कायद्यांनुसार गुन्हा दाखल व्हावा अशी मागणीही कुचेकर यांनी केली आहे.