खुशखबर ! मतदानाला मुळ गावी जाण्याची गरज नाही; राहता तिथे करा मतदान

निवडणुक आयोगाने करुन दिली संधी उपलब्ध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सतराव्या लोकसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. ११ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे. तर १९ मे रोजी लोकसभेच्या शेवटच्या म्हणजे सातव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. तर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी पार पडणार आहे.

या वर्षी पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ९० कोटी मतदार मतदान करणार आहेत. तर १.५ कोटी मतदार हे १८ ते १९ हा तरुण वयोगटातील आहेत. काही लोकं नोकरी निमित्त अथवा शिक्षणानिमित्त आपले मूळ गाव अथवा शहरापासून दूर असता. अशा लोकांना प्रत्येक निवडणुकीला आपल्या मूळ गावी जाऊन मतदान करणे शक्य नसते. म्हणून तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी अथवा शिक्षण घेत आहेत त्याच मतदारसंघात तुम्हाला मतदान करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी मतदारांना आपले नवीन ओळखपत्र बनवून घ्यावे लागणार आहे.

नवीन मतदार ओळखपत्रासाठी  पुढील बाबींची पूर्तता करणे आवश्यक असणार आहे.
१. www.nvsp.in या लिंकवर क्लिक करा. तुम्ही मतदासंघ बदलत असाल तर ६ नंबरचा फॉर्म भरा. तसेच तुम्ही प्रथमच मतदान करण्यासाठी फॉर्म भरत असाल तरीही  ६ नंबरचा फॉर्म भरा.
२. त्यानंतर राज्य अथवा जवळच्या विधानसभा मतदारसंघाची माहिती द्या
३. मतदारसंघ बदलण्याच्या पर्यायावर क्लिक करा
४. तुमच्या  संपूर्ण माहितीचे विवरण भरा
५. तुमचा सध्याचा आणि कायमचा असा दोन्ही ठिकाणचा पत्ता लिहा
६. तुमचा इमेल आयडी आणि मोबाईल नंबर लिहा
७. तुमचा फोटो,वय आणि वास्तव्याचा दाखला अपलोड करा
८.डिक्लेअरेशन फॉर्ममध्ये तुमचा जन्मतारखीचा वैध पुरावा अपलोड करा. त्यानंतर कोपऱ्यात दिलेला नंबर टाकून सबमीट पर्यायावर क्लिक करा.

अशा पद्धतीने तुम्ही तुमचे मतदान स्थलांतरित करू शकता. अधिक माहितीसाठी संबंधित संकेत स्थळास भेट द्या अथवा निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या हेल्पलाईन नंबरवर फोन करून अधिकची माहिती जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like