कामाची गोष्ट ! आता फक्‍त ‘ही’ 4 कागदपत्रे द्या अन् मिळवा पासपोर्ट, असा करा ऑनलाईन अर्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात इंटरनेटमुळे जग खूप जवळ आले आहे. तुम्हाला जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात सहज संपर्क साधता येतो. तसेच देशाबाहेर आंतरराष्ट्रीय प्रवास करणे देखील दिवसेंदिवस सोपे होत आहे. दुसर्‍या देशात नोकरी करणे किंवा मित्रांसह एखाद्या देशास जाणे देखील सामान्य होत आहे. अशा परिस्थितीत आपल्याकडे पासपोर्ट असणे अनिवार्य गोष्ट बनली आहे.

नियमानुसार काही देशांत भारतातील लोकांना पासपोर्टची आवश्यकता नाही, परंतु सुरक्षेमुळे कोणताही देश तुम्हाला पासपोर्टशिवाय प्रवेश देणार नाही. तथापि, प्रक्रिया माहित नसल्याने घाई करत बरेच लोक एजंट्सकडे फेऱ्या मारतात आणि आपले पैसे वाया घालवतात. आता याठिकाणी आम्ही आपल्याला एक सोपा मार्ग सांगत आहोत, ज्याद्वारे आपण ऑनलाइन पासपोर्टसाठी अर्ज करू शकता आणि आपल्याला कोणत्याही एजंटला पैसे देण्याची देखील आवश्यकता नाही.

पासपोर्टसाठी लागणारी कागदपत्रे :
पासपोर्ट साठीच्या ऑनलाईन अर्जासह आपल्याला काही कागदपत्रे आवश्यक आहेत. यात पुढील कागदपत्रांचा समावेश आहे –
1 आधार कार्ड
2 मतदार ओळखपत्र
3 पॅन कार्ड
4 जन्म प्रमाणपत्र / दहावी प्रमाणपत्र

पासपोर्ट साठी अर्ज करण्याची प्रक्रिया :

– पासपोर्टसाठी आपल्याला Passport Seva वेबसाइटवर जावे लागेल.
– आता register now वर क्लिक करा.
– जवळचे पासपोर्ट सेंटर कार्यालय निवडा.
– याठिकाणी जन्मतारीख, लॉगिन आयडी, पासवर्ड इ. माहिती सबमिट करा.
– आपण सबमिट केल्यास आपल्या ईमेलवर एक कन्फर्मेशन ईमेल येईल.
– या ईमेलमधील लिंक क्लिक केल्यानंतर तुमचे खाते सक्रिय होईल.
– त्यानंतर पोस्टपोर्ट कार्यालयात कागदपत्रे पडताळणीसाठी निर्धारित तारीख आणि वेळ ठरवा आणि त्याठिकाणी भेट द्या. तथापि, आपण निर्धारित वेळेच्या १५ मिनिट आधी प्रादेशिक पोस्ट ऑफिसमध्ये (RPO) पोहचले पाहिजे. तेथे फी भरून प्रक्रिया पूर्ण करावी.

पासपोर्टसाठी ऑफलाईन प्रक्रिया आणि खर्च :
याशिवाय ऑफलाइन पासपोर्ट मिळवण्यासाठी तुम्हाला जवळच्या पासपोर्ट कार्यालयात जाऊन पासपोर्टसाठी अर्ज करावा लागेल. पासपोर्ट च्या फी बद्दल सांगायचे झाल्यास १० वर्षांच्या वैधतेचा पासपोर्ट मिळविण्यासाठी १५०० ते २००० रूपये चार्ज लागेल. तर अल्पवयीन मुलासाठी १००० रुपये खर्च येईल. त्याचवेळी, पासपोर्ट हरवला असल्यास, तो खराब झाला असेल किंवा चोरीला गेला असेल तर डुप्लिकेट पासपोर्टसाठी ३००० ते ३५०० रुपयांपर्यंत किंमत मोजावी लागेल.

visit : Policenama.com