‘या’ टिप्स फॉलो करून मेकअपशिवाय दिसा एकदम ‘टकाटक’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – सुंदर दिसण्यासाठी मुली अनेक उपाय करताना दिसतात. त्यासाठी बाजारात मिळणाऱ्या अनेक महागड्या उत्पादनांचा आधार घेण्यात येतो. त्यामुळे त्यांना अनेक स्किन समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे चेहऱ्याचा लूक बिघडतो. अशातच आपलं सौंदर्य जपण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. ज्यामुळे तुम्ही मेकअप न करताच तुमचे सौंदर्य जपू शकता.

आहारावर लक्ष असुद्या

१. फळ आणि भाज्यांबरोबर ड्रायफ्रुट्सचा आहारात समावेश करा.
२. दिवसातून कमीत कमी ८ ग्लास पाणी प्या.
३. व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असलेल्या फळांचं सेवन करा.

योग्य स्किन प्रोडक्टचा वापर करा

१. आपल्या स्किन टाइपनुसार स्किन प्रोडक्टचा वापर करा.
२. तुमची त्वचा तेलकट असेल तर त्वचेवर क्रिमऐवजी जेल मॉयश्चरायझरचा वापर करु शकता.
३. आणि शक्य असेल तर मेकअप लिपस्टिक ऐवजी लिपग्लॉज किंवा लिपबाम वापरु शकता.

कोल्ड्रिंक सोड्या ऐवजी नैसर्गिक फळांच्या ज्युसचं सेवन करा…

सोडा आणि कोल्ड्रिंकमध्ये मोठ्या प्रमाणावर साखर असते म्हणून त्याचे सेवन कमी करा. कारण त्याने पिंपल्स येऊ शकतात.

उशीचा कव्हर वेळोवेळी स्वच्छ करा.

उशी अथवा बेडशीट स्वच्छ ठेवा. त्याचा त्वचेवर चांगला परिणाम होतो.

२२ दिवसांनी करा फेशिअल

दररोज बाहेर फिरल्यामुळे अनेकदा प्रदूषणाचा सामना करावा लागतो. म्हणून २२ दिवसांनी फेशिअल करणं फायदेशीर ठरतं.

(टीप : यापैकी कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)