Apply Tilak According To The Day | दिवसानुसार कपाळावर लावा टिळा, जीवनात येईल सुख

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Apply Tilak According To The Day | हिंदू (Hindu) परंपरेनुसार कोणताही देव किंवा देवीची पूजा तेव्हा संपन्न मानली जाते जेव्हा पूजा विधीपूर्वक केली जाते. पूजेच्या दरम्यान कपाळावर (Forehead) देवाच्या नावाचा टिळा (Tilak) लावला जातो. अशावेळी सनातन धर्मानुसार आठवड्याचे सात वार वेगवेगळ्या देवी-देवतांच्या नावाने समर्पित आहेत, जे आपल्याला सर्व प्रकारच्या समस्या आणि दु:खापासून दूर ठेवतात. अशावेळी दररोज टिळा लावण्याची पद्धत सुद्ध वेगळी आहे. (Apply Tilak According To The Day)

 

एखाद्या वारी चंदनाचा टिळा लावला जातो तर एखाद्या दिवशी कुंकवाचा टिळा लावला जातो. आठवड्याचे सातही दिवस कपाळावर टिळा लावण्याचे काय नियम आहेत, ते जाणून घेवूयात…

 

दिवसानुसार कपाळावर टिळा लावण्याचे नियम (Apply Tilak On Forehead According To The Day)

 

1. सोमवार (Monday)
सोमवार भगवान शंकराचा (Bhagvan Shankar) दिवस मानला जातो. या दिवसाचा ग्रह स्वामी चंद्र आहे. यासाठी या दिवशी पांढरे चंदन, विभूती किंवा भस्माचा टिळा लावावा. यामुळे शिव शंकर प्रसन्न होतात, त्याची कृपा राहते.

 

2. मंगळवार (Tuesday)
मंगळवारी श्री हनुमानाची (Shree Hanuman) पूजा केली जाते आणि या दिवशी ग्रह स्वामी मंगळ आहे. या दिवशी लाल चंदन किंवा चमेलीच्या तेलात मिसळलेल्या कुंकूवाचा टिळा लावण्याची परंपरा आहे. असे केल्याने संकटे दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात.

3. बुधवार (Wednesday)
बुधवारचा दिवस श्री गणेशाचा (shree Ganesh) आहे. या दिवसाचा ग्रह स्वामी बुध आहे. या दिवशी कोरड्या कुंकूवाचा टिळा लावावा. यामुळे कार्य क्षमता वाढते.

 

4. गुरुवार (Thursday)
गुरुवारी भगवान विष्णूची (Bhagvan Vishnu) पूजा केली जाते. या दिवसाचा ग्रह स्वामी गुरू आहे. या दिवशी सफेद चंदनाचे लाकूड दगडावर घासून त्यामध्ये केसर मिसळून टिळा लावावा. यामुळे पैशाच्या समस्या दूर होतात.

 

5. शुक्रवार (Friday)
शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी मातेची (Lakshami Mata) पूजा केली जाते. या दिवसाचा ग्रह स्वामी शुक्र आहे.
या दिवशी लाल चंदनाचा टिळा लावला जातो. यामुळे घरात सुख शांतीचा वास होतो.
या दिवशी कुंकूवाचा टिळा लावण्याने सुद्धा लक्ष्मीची कृपा होते.

 

6. शनिवार (Saturday)
शनिवार भैरव, शनी आणि यमराजाचा दिवस आहे. या दिवसाचे ग्रह स्वामी शनी (Shani) आहे.
या दिवशी विभूती, भस्म किंवा लाल चंदन लावल्याने भैरव प्रसन्न होतात आणि जीवन लाभ मिळतो.

 

7. रविवार (Sunday)
रविवार सूर्यदेवाला (Surya Dev) समर्पित आहे. या दिवसाचा ग्रह स्वामी सूर्य आहे, जो ग्रहांचा राज सुद्धा आहे.
या दिवशी लाल चंदन किंवा कुंकवाचा टिळा लावला जातो. यामुळे मान सन्मान वाढतो आणि भिती नष्ट होते.

 

Web Title :- Apply Tilak According To The Day | apply tilak on the forehead according to the day you will get many benefits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Fenugreek-Methi Leaves Benefits | डायबिटीज रूग्णांसाठी रामबाण मेथीची भाजी, जाणून घ्या हिवाळ्यात खाण्याचे 7 फायदे

Carrot Juice Benefits | हिवाळ्यात गाजर ज्यूसने करा दिवसाची सुरूवात, जाणून याचे 4 जबरदस्त फायदे

Maharashtra Politics | दिवा विझताना तेजोमय होतोच; भाजप-मनसे-शिंदे गटाच्या संभाव्य महायुतीला शिवसेनेचा टोला