विदूर नीति : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ‘या’ ४ गोष्टी कायम लक्षात ठेवा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – महात्मा विदुरचे नाव महाभारतात मोठ्या आदराने घेतले जाते. विदूर हे नीतिचे मोठे माहितगार होते. फक्त तेव्हाच्या काळात नाही तर आता देखील विदुर नीतिने आपले विशेष स्थान कायम ठेवले आहे. जीवनातील अनेक संकटातून वाचण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी विदुर नीति आज देखील आपल्याला सहाय्यकार ठरते.

१. महात्मा विदुर यांच्या नुसार प्रत्येकाला धनवान होण्याची इच्छा असते. परंतू शरीराला कष्ट देऊन आणि मनाला त्रास देऊन धन मिळण्याची वेळ आली तर असे धन कमवण्याची इच्छा सोडून दिली पाहिजे. अशा पैशांबाबत विचार करणे देखील सोडून दिले पाहिजे.

२. महात्मा विदुर नुसार जीवनात त्या लोकांवर विश्वास ठेवणे अवघड होते जे वेळे वेळी आपले मत बदलत असतात. असे लोक कधीच कोणाच्या जवळचे नसतात. अशा लोकांपासून दूर राहावे, कारण ते केव्हा ही धोका देऊ शकतात.

३. विदुराच्या मते समजदार व्यक्ती खोट्याचा आधार घेऊन आपले नाते कायम ठेवू शकत नाहीत, कारण एक वेळेस त्याच्याकडून तुम्ही खोटे सांगून काम करुन देऊ शकतात, मात्र वेळ आल्यावर तो समजदार व्यक्ती याचा बदला घेतो.

४. महात्मा विदुर यांच्यामते आपल्यात काही असे लोक असतात, जे दुसऱ्याचे यश पाहून खूश होत नाहीत, अशा लोकांपासून कायम दूर रहावे. जीवनात कोणाची ईर्ष्या करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मनात डोकवा आणि तुमच्यात काय कमी आहे ते पहा, ज्यामुळे तुमच्या यशात अडचणी येत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

या कारणामुळे होतो ” ब्रेस्ट कॅन्सर “जाणून घ्या याची लक्षणे 

आजारापासून बचाव करण्यासाठी ‘मुळा’ गुणकारी, रहाल निरोगी 

एक रामबाण उपाय जो तुम्हाला म्हातारपणीही देतो तारूण्याचा अनुभव

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो 

 

सिनेजगत

…म्हणून ‘ती’ सुपरस्टार पुर्ण शरीरावर करायची ‘मेकअप’

‘KGF’चा हिरो अभिनेता यश ६ महिन्यातच होणार दुसऱ्यांदा ‘बाप’

मराठी चित्रपटाच्या ‘ट्रेलर’ लॉंचिंगला आलेल्या ‘किंग’ शाहरुखने खुलेआम ‘उतरवली’ !