भिडे गुरूजींना ISRO चं प्रमुख करा, PM नरेंद्र मोदींना पत्र

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर सरचिटणीस परीक्षित तळोकार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून भिडे यांची इस्रोच्या प्रमुखपदी नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे. तळोकार यांचे हे पत्र सोशल मीडियावर सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.
NCP Letter
भिडे गुरुजी यांनी चांद्रयान २ वर भाष्य करताना एक खळबळजनक विधान केले होते त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले होते. या आधीही भिडे गुरुजींनी अशीच काहीशी वक्तव्य केली होती. मात्र यावेळेस राष्ट्रवादीने भिडे गुरुजींवर याच वक्तव्यावरुन निशाणा साधला आहे. आता त्यांना इस्रोचे प्रमुख बनवण्याची मागणी राष्ट्रवादीने पंतप्रधानांकडे केली आहे. तळोकार यांनी लिहिलेल्या पत्राचा विषय ‘आध्यात्मिक गुरु श्री मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांची इस्रोच्या प्रमुखपदी नेमणूक करण्याबाबत मागणी,’ असा उल्लेख केला आहे.

नेमकं काय म्हटलंय या पत्रात –
अध्यात्मिक गुरु मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांची इस्रोच्या प्रमुख पदी नेमणूक करण्यात यावी. भारताच्या उज्वल भविष्यासाठी ही नेमणूक करण्यात यावी. श्रीहरी कोट्टामधील सर्व सूत्रे त्यांच्याकडे दिल्यास ते पंचांग बघून पुढचा कार्यक्रम करतील. थोड्याच दिवसात इस्रो अमेरिकेच्या नासा या संस्थेपेक्षा अव्वल ठरेल त्यामुळे या मागणीचा विचार करावा.

अमेरिकेने एकादशीच्या दिवशी चांद्रयान सोडल्यानेच त्यांची चांद्रमोहीम यशस्वी झाली असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींनी सोमवारी केलं होते. भिडेंच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून चांगलाच खरपूस समाचार घेण्यात आला आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like