राज्यात 7 IAS अधिकाऱ्यांच्या नवनियुक्त्या तर 6 अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य सरकारने बुधवारी (२१ ऑगस्ट) महाराष्ट्रात सात नवीन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना पदस्थापना करत नियुक्ती दिली. तसेच आधीच महाराष्ट्र सेवेत असणाऱ्या ६ अधिकाऱ्यांच्या बदलीचे देखील आदेश दिले आहेत. नव्याने महाराष्ट्रात नियुक्त होणारे सातही आयएएस अधिकारी २०१७ च्या बॅचचे असून त्यांनी नुकताच प्रशिक्षणाचा भाग म्हणून केंद्रातील सहाय्यक सचिव या पदावरील कालावधी पूर्ण केलेला आहे.

या बद्दलचे आदेश महाराष्ट्राच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव श्रीमती स. रि. बांदेकर-देशमुख यांच्या स्वाक्षरीने पारित करण्यात आले आहेत. तसेच या शासननिर्णयाच्या प्रति महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतसथळावर उपलब्ध आहेत.

नव्याने केंद्रातील प्रशिक्षण कालावधी पूर्ण करून महाराष्ट्रात नियुक्त होणारे आयएएस अधिकारी याआधी केंद्रीय मंत्रालयातील वेगवेगळ्या विभागांच्या सहाय्यक सचिवपदी कार्यरत होते तर आता त्यांची नियुक्ती महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या ‘एकात्मक आदिवासी विकास प्रकल्पांवर प्रकल्प अधिकारी व सहायक जिल्हाधिकारी’ पदी नेमणूक झाली आहे. अधिकारी आणि त्यांची नियुक्ती झालेले पदे, प्रशासकीय विभाग व जिल्हे पुढीलप्रमाणे :

१. श्री.राहूल गुप्ता – प्रकल्प अधिकारी, एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प व सहाय्यक जिल्हाधिकारी, अहेरी, जि.गडचिरोली

२. श्रीमती वसुमना पंत – प्रकल्प अधिकारी, एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प व सहाय्यक जिल्हाधिकारी, धारणी , जि.अमरावती

३. श्रीमती मिताली सेठी – प्रकल्प अधिकारी, एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प व सहाय्यक जिल्हाधिकारी, नंदुरबार, जि.नंदुरबार

४. श्री.मनुज जिंदाल – प्रकल्प अधिकारी, एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प व सहाय्यक जिल्हाधिकारी, भामरागड, जि.गडचिरोली

५. श्री.प्राजित प्रभाकर नायर – प्रकल्प अधिकारी, एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प व सहाय्यक जिल्हाधिकारी , जव्हार , जि.पालघर

६. श्रीमती भाग्यश्री दिलीप विसपुते – प्रकल्प अधिकारी, एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प व सहाय्यक जिल्हाधिकारी ,पांढरकवडा, जि.यवतमाळ

७. श्री. अविनाश पांडा – प्रकल्प अधिकारी, एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प व सहाय्यक जिल्हाधिकारी ,चिखलदरा, जि.अमरावती

महाराष्ट्रात आधीपासूनच कार्यरत असलेल्या ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्यशासनाने केल्या आहेत. त्यांची नावे आणि नियुक्तीची ठिकाणे पुढीलप्रमाणे :

१. श्री.व्ही.व्ही.माने, भाप्रसे, (२००९) – आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे.

२. श्री.एस.एम.लोखांडे, भाप्रसे, (२००४) – मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, मुंबई

३. श्री.बिपीन श्रीमाळी, भाप्रसे, (१९९२) – व्यवस्थापकीय संचालक, महात्माफुले मागासवर्ग विकास महामंडळ,मुंबई.

४. डॉ.इांदुराणी जाखर, भाप्रसे, (२०१५) – सहायक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी, एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली

५. श्री.एम.बी.वारभुवन, भाप्रसे, (२०१०) – मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पालघर.

६. श्री.एस.एस.पाटील, भाप्रसे, (२०११) – मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अहमदनगर

आरोग्यविषयक वृत्त –