इंदुरीकर महाराजांच्या खटल्यासाठी नवीन सरकारी वकिलांची नियुक्ती

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख- इंदुरीकर यांनी केलेल्या अपत्ये जन्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोपावरून आरोग्य विभागाने पीसीपीएनटी (प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा) कायद्याचा भंग केल्याचा खटला दाखल केला. सध्या या खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे. दरम्यान, इंदुरीकर महाराजांचे वकील अ‍ॅड. के. डी. धुमाळ यांच्याकडे सरकारी वकील अ‍ॅड बी. जी. कोल्हे यांच्या भावाचे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे या संबंधांचा यांच्या इंदुरीकरांच्या खटल्यावर परिणाम होऊ शकतो असा आरोप केला. परिणामी, डॉ. कोल्हे यांनी याप्रकरणी व्यक्तिगत चिखलफेक होण्यापेक्षा मला या खटल्याचा कामात स्वारस्य नसते सरकारी वकिल कार्यालयास कळवून आपले वकीलपत्र मागे घेतले आहे या खटल्याची आज असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणी येत्या २ डिसेंबरला होणार आहे.

दरम्यान, या प्रकरणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे अ‍ॅड. रंजना गवांदे बाजू मंडित आहेत सर्वांनी लेखी युक्तिवाद सादर करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.