गुन्हे शाखेत दोन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

नव्यानेच सुरू झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयातील गुन्हे शाखेत दोन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. दि. 15 ऑगस्ट रोजी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाची सुरवात झाली असून आयुक्‍तालयात पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिस दलातील काही पोलिस ठाण्यांचा समावेश करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’822ef356-c003-11e8-84ed-01c7373cf55b’]

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाच्या गुन्हे शाखेत पोलिस निरीक्षक सुधाकर काटे आणि पोलिस निरीक्षक यु.व्ही. तांगडे यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. निरीक्षक काटे यांच्याकडे युनिट-1 ची तर निरीक्षक तांगडे यांच्याकडे युनिट-2 ची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पोलिस आयुक्‍त आर.के. पद्मनाभन आणि अप्पर आयुक्‍त मकरंद रानडे यांनी पोलिस निरीक्षकांच्या नियुक्‍तीचे आदेश जारी केले आहे. काही दिवसांपुर्वी पोलिस आयुक्‍त आर.के. पद्मनाभन यांनी चाकण पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी सुनिल पवार यांची नियुक्‍ती केली होती तर आळंदी आणि चाकण वाहतुक शाखेत देखील पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज (सोमवारी) पोलिस निरीक्षक सुधाकर काटे आणि निरीक्षक यु.व्ही. तांगडे यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. निरीक्षक काटे यांनी यापुर्वी पुणे शहरातील विश्रांतवाडी आणि बंडगार्डन पोलिस ठाण्यात कर्तव्य बजाविले आहे. गणेश विसर्जन मिरवणुक संपल्यानंतर दुसर्‍याच दिवशी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आगामी काळात आणखी काही नियुक्त्या होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

‘मेरे पुलिस अब दोपहर का लंच अपने घर करेंगे : पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेश