राज्यातील 3 अप्पर पोलीस महासंचालकांच्या नियुक्त्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन-  राज्य गृह विभागाने आज (मंगळवार) राज्यातील 3 अप्पर पोलिस महासंचालकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. प्रशिक्षण प्रतिनियुक्‍तीवरून परत हजर झालेल्या दोघा अप्पर पोलिस महासंचालकांचा त्यामध्ये समावेश आहे. अप्पर पोलीस महासंचालकांच्या नियुक्‍ती बाबतचे आदेश गृह विभागाचे उप सचिव कैलास गायकवाड यांनी काढले आहेत.

नियुक्त्या करण्यात आलेल्या अप्पर पोलीस महासंचालकांचे नाव आणि त्यांच्या नियुक्‍तीबाबत पुढील प्रमाणे. प्रशिक्षण प्रतिनियुक्‍तीवरून परत हजर झालेले राजेंद्र सिंह यांची अप्पर पोलीस महासंचालक (विशेष कृति दल) महराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, मुंबई येथे नियुक्‍ती करण्यात आली आहे. प्रशिक्षण प्रतिनियुक्‍तीवरून परत आलेले एस. जगन्‍नाथन यांची अप्पर पोलीस महासंचालक (नियोजन व समन्वय) , महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे नियुक्‍ती करण्यात आली आहे तर अप्पर पोलीस महासंचालक (नियोजन व समन्वय) धनंजय डी. कमलाकर यांची अप्पर पोलीस महासंचालक (धोरण) महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, मुंबई येथे नियुक्‍ती करण्यात आली आहे.