राज्यातील 7 वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांच्या नियुक्त्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- राज्य गृह विभागाने आज (मंगळवार) राज्यातील 7 वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांच्या नियुक्त्या आणि बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये 3 अप्पर पोलिस महासंचालक आणि 4 अप्पर पोलीस आयुक्‍तांचा समावेश आहे. नियुक्‍ती आणि बदल्यांबाबतचे आदेश गृह विभागाचे उप सचिव कैलास गायकवाड यांनी मंगळवारी काढले आहेत.

बदल्या तसेच प्रशिक्षण प्रतिनियुक्‍तीवरून परत हजर झालेल्या अप्पर पोलीस महासंचालक आणि अप्पर पोलीस आयुक्‍तांची नावे आणि त्यापुढील कंसात त्यांच्या नियुक्‍तीचे ठिकाण तसेच कोठुन कोठे बदली झाली आहे हे पुढील प्रमाणे आहे.

अप्पर पोलीस महसंचालक राजेंद्र सिंह (प्रशिक्षण प्रतिनियुक्‍तीवरून परत हजर ते विशेष कृति दल, महराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, मुंबई), अप्पर पोलीस महासंचालक एस. जगन्‍नाथन (प्रशिक्षण प्रतिनियुक्‍तीवरून परत हजर ते नियोजन व समन्वय, महाराष्ट्र राज्य, मुंबई), अप्पर पोलीस महासंचालक धनंजय डी. कमलाकर (नियोजन व समन्वय ते धोरण, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, मुंबई) अप्पर पोलीस आयुक्‍त रविंद्र ए. शिसवे (मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई ते संरक्षण व सुरक्षा, मुंबई), अप्पर पोलीस आयुक्‍त निशित मिश्रा (संरक्षण व सुरक्षा, मुंबई ते दक्षिण प्रादेशिक विभाग, मुंबई), अप्पर पोलीस आयुक्‍त एस. वीरेश प्रभु (वाहतूक, मुंबई ते मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई) आणि अप्पर पोलीस आयुक्‍त प्रविणकुमार पडवळ (दक्षिण प्रादेशिक विभाग, मुंबई ते वाहतूक, मुंबई).