राज्यसभेच्या नव्या खासदारांची संसदीय स्टँडिंग कमिटीवर नियुक्ती, कोणला दिली कोणती कमिटी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – राज्यसभेवर नुकत्याच नवनिर्वाचित खासदारांनी शपथ घेतली. या नवनिर्वाचित खासदारांची नियुक्ती संसदेच्या स्टँडींग कमिटीवर राज्यसभेच्या केली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, खासदार शरद पवार यांना संरक्षण खात्याशी संबंधित समितीवर सदस्य म्हणून नियुक्त केले आहे. तर, खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे रेल्वे तर खासदार रंजन गोगोई यांना परराष्ट्र विषयक कमिटीवर नियुक्त केले आहे. खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांना मनुष्यबळ विकास संसदीय समितीवर चेअरमन म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

कोरोनाच्या संकट काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची समस्या निर्माण झाली आहे तर, चीन आणि पाकिस्तानसोबत संघर्ष होत आहे. त्यामुळे संरक्षण समितीकडे देशाचे लक्ष असणार आहे. या दोन्ही समित्यांवर मराठी खासदारांची नियुक्ती केली आहे.

यंदा कोरोना विषाणूसह आणि भारत-चीन हे प्रमुख मुद्दे आहेत. सध्या देशात भारत-चीन विवाद सुरू आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, खासदार शरद पवार यांच्याकडे संरक्षण कमिटी दिली आहे.

जाणून घ्या, कोणाकडे आहे कोणती कमिटी :
– विनय सहस्त्रबुद्धे : एचआरडी, चेअरमन
– शरद पवार : डिफेन्स कमिटी
– उदयनराजे : रेल्वे कमिटी
– प्रियांका चतुर्वेदी : कॉमर्स कमिटी
– डॉ. भगवान कराड : पेट्रोलियम कमिटी
– ज्योतिरादित्य सिंधिया : एचआरडी कमिटी
– रंजन गोगोई : परराष्ट्र विषयक कमिटी
– राजीव सातव : डिफेन्स कमिटी