आळंदी, चाकण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांच्या नेमणूका

पुणे ः पोलीसनामा ऑनलाईन

 

नव्यानेच सुरू झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयात हजर झालेल्या 3 पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या आज (बुधवारी) करण्यात आल्या आहेत. 3 पोलिस निरीक्षकांच्या नियुक्‍तीबाबत पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्‍त आर.के. पद्मनाभन यांनी स्वतः आदेश जारी केले आहेत. नियुक्त्या झालेल्या पोलिस निरीक्षकांनी तात्काळ संबंधित विभाग तसेच पोलिस ठाण्याच्या कार्यभार स्विकारून त्याबाबत नियंत्रण कक्षास कळविण्यास सांगण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B01AUUSP8I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’316e69bc-b111-11e8-a81a-ddffea56d495′]

अहमदनगर पोलिस दलातील सायबर पोलिस ठाण्यातुन पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयात बदली झालेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांनी चाकण पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे तर पुण्याच्या विशेष शाखेतून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाकडे वर्ग करण्यात आलेले पोलस निरीक्षक आर.पी. चौधर यांची आळंदीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. नव्याने हजर झालेले उमेश तावस्कर यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली असून त्यांच्यावर चाकणच्या वाहतूक विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दि. 15 ऑगस्ट रोजी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालय कार्यान्वीत झाले आहे. त्यासाठी यापुर्वीच पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मात्र, पुणे ग्रामीणच्या हद्दीतील काही पोलिस ठाण्यात प्रभारी अधिकार्‍यांच्या नेमणुका करणे बाकी होते. आज (बुधवारी) पोलिस आयुक्‍तांनी 3 पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. आगामी काळात आणखी काही नियुक्त्या होणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या हद्दीतील आळंदी आणि चाकण पोलिस ठाणे हे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाशी जोडण्यात आले आहे. चाकण आणि आळंदी ही दोन पोलिस स्टेशन अतिशय महत्वाची आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांना चाकण, आर.पी. चौधर यांना आळंदी पोलिस ठाण्याच्या कार्यभार तात्काळ घेण्यास सांगण्यात आले आहे तर पोलिस निरीक्षक उमेश तावस्कर यांना तात्काळ चाकणच्या वाहतूक विभागाच्या जबाबदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जाहीरात