परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या जिंतूर तालुका अध्यक्षपदी रमेश गिते यांची नियुक्ती

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – रमेश गिते यांची कार्य पार्श्वभूमी पाहून माजी आमदार विजय भांबळे यांनी त्यांची ( 4 / ऑक्टोबर ) रोजी परभणी जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस (ओबीसी सेल) च्या जिंतूर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार आमदार विजय भांबळे यांनी या नियुक्तीप्रसंगी बोलताना रमेश गीते यांच्यावर विश्वास व्यक्त केला. आणि पक्ष विचार धारा बळकट करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्ष कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत माजी आमदार विजय भांबळे यांच्या हस्ते रमेश गिते यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. रमेश गीते यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल उपस्थित पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी बोलताना रमेश गिते म्हणाले की, जिल्ह्यातील पक्ष नेते व पदाधिकारी यांनी दाखविलेला विश्वास साकार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष (ओबीसी सेल) दत्तात्रय मायंदळे यांच्यासह पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (ओबीसी सेलचे ) जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मायंदळे यांनी रमेश गिते यांचे अभिनंदन केले तसेच त्यांना आगामी निवडणुकीसाठी कामाला लागण्याचा संदेश त्यांनी दिला.