महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट या सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी रशीद शेख यांची नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट या सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी रशीद शेख यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नदीम मुजावर यांच्याहस्ते देण्यात आले.

रशीद शेख हे पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष असून ते माजी नगरसेवक आहेत. या नियुक्तीनंतर रशीद शेख यांनी सांगितले कि, महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट या सामाजिक संघटनेची जबाबदारी माझ्यावर सोपविल्याने आनंद होत आहे. संघटनेच्यावतीने विविध प्रश्नांच्या अडीअडचणी सोडविणार आहे. तसेच, येणाऱ्या काळात महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट या सामाजिक संघटनेच्यावतीने सर्व धर्मीय बांधवांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करणार आहे .

यावेळी महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट या सामाजिक संघटनेचे सल्लागार कुंदन पुनावाला, शहाजी सावंत, मुस्तफा कपाडिया, विनोद सोळंकी, पुणे शहर अध्यक्ष जफर खान, पुणे जिल्हा अध्यक्ष सुलतान नाझा, शहाबुद्दीन शेख, इरफान शेख, ख्वाजा पठाण, अबू इनामदार, बशिर शेख, नाहिद मुजाव, फिरोज आतार, असिफ कुरेशी, एजाज शेख, स्वीटी पुनावाला व ऍडम मयानी आदी मान्यवर उपस्थित होते .