संगिता डाहुले यांची जिल्हा महिला कार्याध्यक्षपदी नियुक्ती

भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन – येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा छावा छात्रवीर सेनेच्या विदर्भ महिला अध्यक्ष संगिता सुरेश डाहुले यांची नॅशनल सोशालिस्ट पार्टी संलग्नित माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या चंद्रपूर जिल्हा महिला कार्याध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.

ही नियुक्ती समितीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रशांत रामटेके यांच्या शिफारशीवरुन राज्य संपर्क प्रमुख कमलेश शेवाळे आणि राज्य अध्यक्ष दिपक कांबळे यांनी केली. त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.