पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे वाचक म्हणून ‘या’ वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांची पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे वाचक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हे आदेश दिले आहेत.

पूर्वीच्या आयुक्तांच्या वाचक पोलीस निरीक्षक राधिका फडके यांना त्यांच्या असलेल्या गुन्हे शाखेत गुन्हे शाखा येथे हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

दीपक लगड हे सध्या डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक होते. त्यापूर्वी ते गुन्हे शाखा व सायबर पोलीस ठाणे येथे कर्तव्यास होते. गुन्हे शाखेतून त्यांची डेक्कन पोलीस ठाण्यात बदली झाली होती. लगड यांना तात्काळ हजर होऊन वाचक पदाचा पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.