कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या मंत्रालयीन सचिव पदी शाहरुख मुलाणी यांची नियुक्ती

मुंबई | पोलीसनामा आॅनलाइन – राज्यातील कंत्राटी कर्मचारी यांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या सचिव तथा मंत्रालयीन सचिव पदी शाहरुख मुलाणी यांना नियुक्ती पत्र अध्यक्ष मुकुंद जाधवर यांच्या हस्ते देण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ec07eed8-cfab-11e8-ba28-0733660b66e5′]

महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाची राज्य स्थरीय बैठक पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे नुकतीच झाली असून दरम्यान या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला असे सांगून अध्यक्ष जाधवर म्हणाले की, मंत्रालयीन स्थरावरील संघटनेचे काम अधिक सुलभ व्हावे आणि राज्यातील कंत्राटी कर्मचारी यांच्या हक्काच्या मागण्यांना न्याय मिळावा म्हणून सदर नियुक्ती करण्यात येत आहे असे स्पष्ट केले.

‘या’ मतदार संघातून रामदास आठवले आगामी निवडणूक लढविणार 

[amazon_link asins=’B07B6G2VHN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’05419a96-cfac-11e8-97a2-0b36d2242e9e’]

दरम्यान मुलाणी म्हणाले की, राज्यात मंत्रालय ते ग्रामपंचायत पर्यंत सर्व शासकीय व निमशासकीय विविध विभागात आस्थापनेवर व कंत्राटदाराकडून कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. अशा सर्व कंत्राटी कर्मचारी यांना न्याय देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असून मंत्रालयीन पातळीवर सर्व कंत्राटी कर्मचारी यांच्या हिताचे शासन निर्णय, परिपत्रक, शासन आदेश आदी साठी मंत्र्यांकडे सतत पाठपुरावा करून न्याय देण्याचा प्रयत्न करणे असे सचिव शाहरुख मुलाणी यांनी सांगितले. तसेच मंत्रालयातील अनेक विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या जागांवर कंत्राटी कर्मचारी काम करत असून त्यांच्या कामाचा समान काम, समान वेतन असा मोबदला मिळत नाही. एकीकडे कंत्राटे घेणाऱ्या खाजगी संस्था आणि दुसरीकडे सरकारकडून या कंत्राटी कर्मचारी घोर फसवणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकार दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे मुलाणी यांनी सांगितले.

नागोबामुळे पोलीसांची उडाली भंबेरी

यावेळी अध्यक्ष मुकुंद जाधवर, कोषाध्यक्ष विकास डेकाडे, उपाध्यक्ष प्रमोद अहिरराव, जिल्हा परिषद आरोग्य संघटना अध्यक्ष अरुण खरमाटे, राष्ट्रीय किसान क्रांती महासंघ समन्वयक संदिप गिड्डे सह महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.