अभिमानास्पद ! अ‍ॅप्पलमध्ये ‘या’ भारतीय व्यक्‍तीची मोठया पदावर नियुक्‍ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनी अ‍ॅप्पल मध्ये एका भारतीय व्यक्तीला मोठ्या हुद्यावर नोकरी लागली आहे. सबीह खान यांना अ‍ॅप्पल कंपनीचा सीनिअर वाइस प्रेसि़डंट ऑपरेशंस म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. शुक्रवारी अ‍ॅप्पलने कॅलिफोर्निया मधील आपल्या हेडक्वार्टरमध्ये सबीह खान यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

या पदावर काम करणारा पहिला भारतीय
१९९० सालापासून अ‍ॅप्पल मध्ये काम करणाऱ्य़ा सबीह खान हे प्रोडक्ट ऑपरेशन्स आणि सप्लाय चेन या मोठ्या जबाबदारी असलेल्या पदावर काम करत होते. अ‍ॅप्पलचे प्रोडक्ट्स विकासित करण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे. आपल्या या यशामुळे सबीह खान यांनी संपुर्ण जगात भारताचे आणि मुरादाबादचे नाव रोशन केले आहे. जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी अ‍ॅप्पल मध्ये ऐवढ्या मोठ्या पदावर पोहचणारे हे पहिले भारतीय आहे.

उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद मधील रहिवासी
सबीह खान यांचा जन्म १९६६ मध्ये मुरादाबाद येथे झाला. मुरादाबाद येथील ब्रास एक्सपोर्ट इंडस्ट्रीचे संस्थापाक यार मोहम्मद खान यांच्या कुटूंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सईद यू खान रामपूरचे रहिवासी आहेत. १९६३ साली यार मोहम्मद खान यांची नात साजदा खान यांचे लग्न सईद यू खान यांच्याशी झाल्यानंतर खान देखील तेथेच एक्सपोर्टच्या व्यवसायाचे काम सुरु केले.

सबीह खान यांचे पाचवी पर्यंतचे शिक्षण मुरादाबादच्या सेंट मेरी स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्याचे वडील सर्व कुटूंबाला घेऊन सिंगापूरला आले. त्यांनी सिंगापूरमध्ये स्वत:चा व्यवसाय सुरु केला.

सबीह खान यांच्या भावाने सांगितले की, सबीह यांचे शालेय शिक्षण सिंगापूर मध्ये झाले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत मॅकेनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले. साबीह यांनी वॉशिंग्टन मधील एका मुली बरोबर विवाह केला, त्यांना ३ मुले आहेत. ते आता सिंगापूरमध्येच सेटल झाले आहेत.

पंतप्रधान मोदी जेव्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर होते तेव्हा अ‍ॅप्पल चीफ टिम कुक यांची भेट घेताना सबीह देखील त्यांच्या सोबत होते.

‘बेबी डॉल’ सनी लिओनीने बॉयफ्रेंडसोबत केले सलग ६ ‘पॉर्न’ सिनेमे

Video : ‘या’ अभिनेत्रीने कॉपी केला दीपिका पादुकोणचा ‘लुक’

कांबळे दुहेरी हत्याकांडातील तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा

कडुबाई खरात यांच्यासह अनेक मातंग बांधव घेणार धम्मदीक्षा

व्यायामाचा आनंद वाढविण्यासाठी ही आहे ‘बेस्ट आयडिया’

कोवळे पिंपळपान हृदयातील ब्लॉकेजेसाठी वरदान

You might also like