महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाच्या सदस्यपदी विलास इंदलकर यांची नियुक्ती

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाच्या सदस्यपदी विलास इंदलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.

इंदलकर यांनी यापूर्वी पुणे विभागात अप्पर राज्यकर आयुक्त म्हणून काम केले आहे. कार्यकाळात त्यांनी प्रशासकीय कामकाजात अनेक सुधारणा केल्या असून, काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात प्रलंबित असणारी अपिले निकाली काढण्यासाठी नियोजन केले आहे. त्याचा शासनाला फायदा झाला असून, थकबाकी वसुल होण्यास मोठा हातभार लागला आहे. तर त्यांनी अनेक प्रशासकीय निर्णय घेवून कामकाजात गतिमानता आणली होती. त्यामुळे नवीन आलेला वस्तू व सेवा कर कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात पुणे विभाग महाराष्ट्रात अग्रेसर राहिला आहे.

तत्पूर्वी त्यांनी कोल्हापूर विभागात उत्कृष्ठ प्रशासकिय कामकाज बद्दल केल्याबाबत त्यांना राज्य गौरव पुरस्काराने देऊन सन्मानित करण्यात आले आहे. नवीन आलेला वस्तू व सेवा कर कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात कोल्हापूर विभाग महाराष्ट्रात अग्रेसर राहिला आहे. जीएसटी सुरू झाल्यानंतर कार्यालयीन उत्कृष्ट कामगिरीसाठी कोल्हापूर विभागाला आयएसओ मानांकन मिळाले आहे. व्यापारीव्यावसायिक संघटनांकडून त्यांचे निवडीनंतर स्वागत करून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.