युवासेनेच्या राज्य सह सचिव पदी विशाल सातव यांची नियुक्ती

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – वाघोली ता. हवेली येथील शिवेसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते व पुणे जिल्हा युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख विशाल सातव यांची महाराष्ट्र राज्य शिवसेना युवासेनेच्या सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने वरुण सरदेसाई यांनी पुणे जिल्ह्यातील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये विशाल सातव यांच्यावर सहसचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. युवासेनेच्या हवेली तालुका व पुणे जिल्हा प्रमुखपदी कार्यरत असताना त्यांनी अनेक आंदोलने व राजकीय, सामाजिक विषयामध्ये सहभाग घेतला आहे.

यानिवडी नंतर बोलताना सातव यांनी सांगितले की, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना – युवासेनेची ध्येय धोरणे राबवून पक्षवाढीसाठी एकनिष्ठेने काम करणार आहे. तर तरुणांने संघटना मजबुत करण्यासाठी विशेष पर्यत करणार आहे.