येत्या 6 आठवड्यात साईबाबा संस्थानवर नवीन विश्वस्त मंडळ नेमा- सुप्रीम कोर्ट

शिर्डी : पोलीसनामा आॅनलाईन

सुप्रीम कोर्टाने विश्वस्त मंडळ आणि सरकारला चांगलाच दणका दिला आहे. येत्या 6 आठवड्यात साईबाबा संस्थानवर नवीन विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दिले. 2016 साली श्री साईबाबा विश्वस्त मंडळाची नेमणूक करण्यात आली होती. ही नेमणुक करताना 9/1/F नुसार स्वच्छ चारित्र्याचे, कोणतेही गुन्हे नसलेले सदस्य नेमावेत असे नमूद केलेलं होतं. तरीही विश्वस्त मंडळात नेमणूक केलेल्या अनेक विश्वस्तांवर गुन्हे दाखल असल्याचं माहिती अधिकारात उघड झालं. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळासह सरकारला सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने मोठा दणका बसला आहे. विश्वस्त मंडळ पुनर्गठनाच्या या निर्णयामुळे विद्यमान विश्वस्त मडळावर गंडातर ओढावलंय.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d1bd7b25-cbe7-11e8-ab03-1b0412d16733′]

त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, सचिन भणगे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावर हायकोर्टाने नियमावलीच्या आधारे नवीन विश्वस्त मंडळ नेमण्याचा आदेश दिला होता. हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने सरकारची याचिका फेटाळली असून सहा आठवड्यात नवीन विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने विश्वस्तांच्या निवडीवर अनेक ताशेरे देखील ओढले आहेत. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. सतिष तळेकर, प्रज्ञा तळेकर यांनी बाजू मांडली.
[amazon_link asins=’B079Q64PW6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d6a40f57-cbe7-11e8-976c-695ab3950404′]

2016 मध्ये महाराष्ट्र सरकारने साईबाबा संस्थानच्या मंजूर 17 विश्वस्तांपैकी केवळ 11 विश्वस्त नियुक्त केले. त्यात 3 शिवसेनेचे व 8 भाजपाचे होते. राजकीय वादातून शिवसेनेचे सदस्य एकाही बैठीकाला आले नाहीत, त्यामुळे त्यांचे पद रद्द झाले होते. विश्वस्त मंडळामध्ये माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे, शिर्डीतील भाजयुमोचे नेते सचिन तांबे, भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पती बिपीन कोल्हे, खासदार गजानन किर्तीकर यांचा मुलगा अमोल किर्तीकर, शिवसेनेचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांच्यासह डॉ. मनिषा कायंदे, मोहन जयकर, प्रताप भोसले, डॉ. राजेंद्र सिंग यांचा समावेश करण्यात आला होता.

मुख्यमंत्री घेणार मराठवाड्यातील दुष्काळाचा औरंगाबादमध्ये आढावा 

You might also like