दक्ष सिटीझन फांऊडेशनचे पोलिस उपायुक्तांकडून कौतुक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

आज एक जूनचा मुहर्त साधत दक्ष सिटीझन फांऊडेशन या संस्थेचा कौतुक सोहळा पुणे परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त डॉ. प्रविणजी मुंडे यांनी त्यांच्या कार्यालयात मोठ्या खेळीमेळीने पार पाडला.

दक्ष सिटीझन फांऊडेशन ही एक समाजपयोगी तसेच पुणे शहरातील पोलिस दलाच्या सेवेची दखल घेत विविध उपक्रम राबिवणारी संस्था असून आजपर्यंत या संस्थेने पोलिसांकरिता रक्तदान शिबिर, आरोग्यविषयक मार्गदर्शन, कौंटूबिक विषय वैगेरे बरेच कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या अशा विविध उपक्रमांमुळे एकीकडे पोलिसांशी समाजाची असलेली आपुलकी अजून ही कशी टिकून आहे याचे बोलके उदाहरण दिसतेच तर दुसरीकडे पोलिसांवरील होत असलेले हल्ले भविष्याच्या दृष्टीने कसे घातक आहे हे पटवून देण्याचे काम काही प्रमाणात दक्ष सिटीझन फांऊडेशनच्या अध्यक्षा अॅड. चित्राताई जानगुडे व इतर सदस्य चोख बजावत असल्याची जाणीव होते.

याचाच एक भाग म्हणून आज मा.प्रविणजी मुंडे यांनी या सर्व सदस्यांशी चहापानाचा आस्वाद घेत फांऊडेशन विषयी पुर्ण माहिती घेऊन त्यांच्या समाजाप्रती व पोलिसांविषयी असलेल्या बांधिलकीचे मनापासून कौतुक केले. भविष्यात दक्ष सिटीझन फांऊडेशनला पोलिस दलाकडून समाजापयोगी काही मदतीची गरज भासल्यास आमचे पोलिस दल अशा चांगल्या कामासाठी नेहमीच सहकार्य करेल असे ही नमूद केले.

यावेळी चहापान व गप्पांसाठी पोलिस उपायुक्त डॉ.प्रविणजी मुंडे, दक्ष सिटीझन फांऊडेशनच्या संस्थापक अध्यक्षा अॅड.चित्राताई जानगुडे तसेच सदस्य जयवंतजी जानगुडे, निलेशजी देसरडा, रोहितजी उनवणे व इतर पोलिस अधिकारी/कर्मचारी ही उपस्थित होते.