खूशखबर ! SBI मध्ये अप्रेंटीस पदासाठी नोकरभरती, जाणून घ्या प्रक्रिया

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊनमुळे देशात सगळीकडेच नोकऱ्यांवर संक्रांत आली आहे. त्यामुळे लाखो तरुण नव्या नोकरीच्या आणि संधीच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत
देशातील सर्वात मोठी सहकारी बॅक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने (SBI) अप्रेंटिस पदासाठी जागा काढल्या असून त्याकरिता त्यांनी sbi.co.in वर जाहिरात दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी एसबीआयने अप्रेंटिस पदासाठी जागा काढल्या होत्या. मात्र, परीक्षा रद्द केली होती. तुम्हीही अप्रेंटीस पदासाठी अर्ज केला असले तर तुमच्यासाठी ही बातमी आनंदाची आहे.

बॅंकेच्या वतीने अप्रेंटिस पदासाठी घेतली जाणारी परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने राहणार आहे. जानेवारी 2021 मध्ये ही परीक्षा होणार होती. मात्र, काही कारणामुळे ती रद्द झाली असून एप्रिल 2021 पर्यंत स्थगित केली आहे. अप्रेंटिससाठी परीक्षा कधी होणार याबाबत बँकेच्या वेबसाईटवरून अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला bank.sbi/careers, nsdcindia.org/apprenticeship, apprenticeshipindia.org या वेबसाईटवर जाऊन माहिती घेता येईल.