मांजरी बुद्रुक ते मांजरी खुर्द या मार्गातील मुळा मुठा नदीवरील पुलाच्या कामाला मंजुरी

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन 

मांजरी  बुद्रुक ते मांजरी खुर्द या रस्त्यावरील मुळा मुठा नदीवर असलेल्या बंधाऱ्यावरून वाहतूक होत आहे. परंतु पावसाळ्यामध्ये सदर बंधाऱ्यावर पाणी येत असल्याने या रस्त्यावरून वाहतूक बंद होत होती. आमदार योगेश टिळेकर यांनी केंद्र सरकारच्या नाबार्ड योजनेतून या पुलाची उभारणी व्हावी म्हणून पत्रव्यवहार करून राज्य शासनाकडे मागणी केला होता.

पुणे पाेलिसांनी अटक केलेल्या ‘त्या ‘पाचही जणांचे काश्मीरी फुटीरवाद्यांशी संबंध

राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठवलेल्या यादीमध्ये या पुलाच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने मंजुरी देऊन त्या यादीमध्ये या पुलाचा समावेश केलेला आहे. या नदीवरील पुलाच्या उभारणीसाठी 23 कोटी रुपयांच्या निधीला नाबार्ड योजनेने मंजुरी दिलेली आहे. राज्य सरकारच्या 2019 च्या मार्च अर्थसंकल्पीय अधिवेशनात या निधीचा समावेश होईल आणि 2019 पूर्वी या पुलाची उभारणी होईल असे आमदार योगेश टिळेकर यांनी सांगितले.

[amazon_link asins=’B0794W14FY,B07CC1X3DY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’554a5cbc-ab9a-11e8-bc21-0b4ea97487ff’]