प्रधिकरणाचा (पीसीएनटीडीए) पाच कोटी शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा (पीसीएनटीडीए) सन २०१९ – २० चा ६८० कोटी रुपयांंचा अर्थसंकल्प मंगळवारी मंजूर करण्यात आला. ५ कोटी २७ लाख रुपये शिलकीच्या या  अर्थसंकल्पात भांडवली कामांसाठी ५९२ कोटींची तजवीज आहे. येत्या दोन ते अडीच वर्षात ६ हजार घरांचा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. तर, संविधान भवन, औद्योगिक संग्रहालय, सुसज्ज हेलिपॅड, उद्यानांमध्ये ओपन जिम ही यंदाच्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत.
पीसीएनटीडीएची ३३७ वी सभा अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. २२) पार पडली. त्यात सन २०१९ – २० चा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी सभेला सादर केला. मुख्य लेखा व वित्त अधिकारी भगवान घाडगे यांनी हा अर्थसंकल्प तयार केला आहे. सभेमध्ये त्यावर चर्चा होवून तो संमत करण्यात आला. ६७९ कोटी ८९ लाख ८६ हजार रकमेचा हा अर्थसंकल्प असून त्यात ६७४ कोटी ६२ लाख ६१ हजार एवढा खर्च अपेक्षित आहे. ५ कोटी २७ लाख २५ हजार रुपयांची शिल्लक दर्शविण्यात आली आहे.

जमेच्या तपशीलामध्ये आरंभीची शिल्लक ५०२ कोटी ६६ लाख दाखविण्यात आली आहे. महसुली जमा ३८ कोटी १४ लाख रुपये तर भांडवली जमा १३९ कोटी ८ लाख रुपये आहे. जमेच्या बाजूमध्ये विविध पेठांमधील भुखंड विक्रीतून १०० कोटी, अतिरिक्त अधिमूल्य आणि हस्तांतरण शूल्कातून १७ कोटी ५३ लाख, विकास निधी व व्याजातून ८ कोटी ४२ लाख जमा अपेक्षित धरण्यात आली आहे.

ठेवींवरील व्याजातून २६ कोटी , दंडापोटी १० कोटी ८० लाख आणि ठेकेदारांच्या ठेवीमधून २ कोटी ८६ लाख रुपये जमा अपेक्षित आहे.
खर्चाच्या बाजूला महसुली खर्चासाठी ८२ कोटी १३ लाख तर भांडवली खर्चासाठी ५९२ कोटी ४९ लाख एवढी रक्कम प्रस्तावित आहे. महसुली खर्चामध्ये कर्मचारी आस्थापना खर्च १४ कोटी २० लाख तर आकस्मिक खर्च ६५ कोटी ९२ लाख रूपये आहे. तर भांडवली खर्चामध्ये विविध विकास कामांसाठी १२७ कोटी ५६ लाख, उद्यान, पर्यावरण, सुधारणा व शहरी वनीकरणासाठी २१ कोटी ८२ लाख रुपये, बांधकाम व इतर कामांसाठी ४१३ कोटी ६५ लाख आणि भुसंपादनासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
विकास कामांमध्ये प्रामुख्याने खुल्या प्रदर्शन केंद्रासाठी ४४ कोटी ८१ लाख, पेठ क्रमांक ३० व ३२ मधील गृहयोजनेसाठी १७ कोटी, पेठ क्रमांक ६मधील गृहयोजनेसाठी १८ कोटी ५० लाख, पेठ क्रमांक १२ मधील   गृहयोजनांसाठी अनुक्रमे १२५ कोटी आणि १२० कोटी आणि वाल्हेकरवाडी येथील गृहयोजनेसाठी ४० कोटी, रस्त्याच्या कामांसाठी ३५ कोटी, विद्युतविषयक कामांसाठी २२ कोटी रुपये आणि इतर स्थापत्य विषयक कामांसाठी ४० कोटी ५५ लाख रूपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.

>> अर्थसंकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये

१) पेठ क्रमांक ६, १२, ३० आणि ३२ येथे गृहयोजना राबविणे – ३२५ कोटी
२) पेठ क्रमांक ११ येथे संविधान भवन आणि विपश्यना वेंâद्र बांधणे – ५ कोटी
३) औद्योगिक संग्रहालय, विरंगुळा वेंâद्र आणि ओपन जिम बांधणे – ८ कोटी
४) पेठ क्रमांक ५ आणि ८ येथे सोलार पार्वâ उभारणे – १ कोटी
५) आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रामध्ये हेलीपॅड उभारणे – १ कोटी
६) चिंतामणी चौक ते पॉवर हाऊस २४ मीटर रूंद रस्ता करणे – ५ कोटी
७) पेठ क्रमांक २५ मध्ये सांस्कृतिक भवन बांधणे व दुरूस्त करणे – ५ कोटी
८) औंध – रावेत रस्त्यावर साई चौकात दोन समांतर उड्डाणपुल बांधणे – ५ कोटी
९) खुले प्रदर्शन वेंâद्र बांधणे – ४४.८१ कोटी