स्थायी समितीच्या बैठकीमध्ये तब्बल 81 कोटीच्या खर्चास मंजुरी 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – वाकड परिसरातील रस्त्याचे काम,वैद्यकीय विभागासाठी लागणारे संगणक संच,उद्यान तसेच शाळेत बसविण्याचे खेळण्याचे साहित्य यासह पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासविषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या 81 कोटी 17 लाख 44 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. प्रभाग क्र. 26 मधील छत्रपती चौक उत्कर्ष चौकापर्यंत सिमेंट कॉक्रीटचा रस्ता करणेकामी येणा-या सुमारे 15 कोटी 94 लाख 72 हजार 633 रुपयांच्या खर्चास, रावेत येथील रेल्वे उड्डाणपुलालगत असलेला सेवा रस्ता विकसीत करणे व आनुषंगिक कामे करणेकामी येणा-या सुमारे 4 कोटी 80 लाख 38 हजार 929 रुपयांच्या खर्चास, मनपाच्या जलनिःसारण विभागाकडील कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत प्रभाग क्र. 9 खराळवाडीमधील कामगार नगर, अक्षय विहार सोसायटी, सोनकर सोसायटी, भक्ती सोसायटी परिसर व उर्वरित भागात मलनिःसारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणेकामी येणा-या 21 लाख 99 हजार 673 रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

वैद्यकीय मुख्य कार्यालय व अंतर्गत दवाखाना/रुग्णालय विभागांकरिता आवश्यक 238 नग संगणक संच खरेदीकामी येणा-या सुमारे 1 कोटी 15 लाख 398 रुपयांच्या खर्चास, ई-क्षेत्रीय विद्युत कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील मनपाचे इमारती कार्यालये, शाळा, नाट्यगृहे इत्यादिमध्ये ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा बसविणेकमी येणा-या सुमारे 30 लाख 96 हजार 598 रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्र. 26 वाकड-पिंपळे निलख मधील विविध आरक्षणे विकसित करणेकामी येणा-या 1 कोटी 32 लाख 17 हजार 266 रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

साई चौक येथील चौकात समतल वितलग बांधणे, विद्युत विषयक कामे करणे, प्रकाश व्यवस्था करणेकामी येणा-या 42 लाख 27 हजार 780 रुपयांच्या खर्चास, ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आलेल्या सात संगणक प्रणालींची देखभाल व दुरुस्तीकामी 1 वर्ष मनुष्यबळ उपलब्ध करून देणेकामी येणा-या सुमारे 11 लाख 21 हजार 112 रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्र. 2 मधील देहू-आळंदी रस्त्यालगतचे परिसरातील ताब्यात आलेले रस्ते विकसित करणेकामी येणा-या सुमारे 1 कोटी 55 लाख 2 हजार 729 रुपयांच्या खर्चास, प्रभाग 2 मधील बो-हाडेवाडी बनकरवस्ती मधील ताब्यात आलेले रस्ते विकसित करणेकामी येणा-या सुमारे 1 कोटी 52 लाख 39 हजार 497 रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

मनपाच्या उद्यानांमधील/शाळांमधील खेळणीचे स्पेअर पार्ट पुरविणे व बसविणेकामी येणा-या सुमारे 2 कोटी 94 लाख रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. मिलटरी हद्दीतील बी.ई.जी. दिघी हद्दीमध्ये 35 हजार वृक्षारोपण करून 3 वर्षे देखभाल व संरक्षणकामी येणा-या 3 कोटी 25 लाख 50 हजार रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्र. 27 रहाटणी मधील श्रीनगर, गजानन नगर, रायगड कॉलनी येथील कॉंक्रीट रस्त्यावर विद्युत पॉल उभारणेकामी येणा-या सुमारे 89 लाख 15 हजार 120 रुपयांच्या खर्चास, मनपा प्राथमिक शाळांकरिता इंटरनेट बंडविडथ सेवा एम.पी.एल.एस./ व्ही.पी.एन. द्वारे पुरविणे व देखभाल करणेकामी येणा-या 65 लाख 23 हजार 201 रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

बलदेवनगर झोपडपट्टी, पिंपरी येथे अस्तित्वातील जूने सार्वजनिक शौचालय पाडून तेथे नविन 16 सीट्सचे सुलभ शौचालय बांधणेकामी येणा-या सुमारे 36 लाख 28 हजार 911 रुपयांच्या खर्चास, सुभाषनगर, पिंपरी येथे अस्तित्वातील जूने सार्वजनिक शौचालय पाडून तेथे नविन 16 सीट्सचे सुलभ शौचालय बांधणेकामी येणा-या सुमारे 38 लाख 89 हजार 818 रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्र. 17 बिर्ला हॉस्पिटल ते वाल्हेकरवाडी रोड येथे पैसे द्या व वापर तत्वावर स्त्री व पुरुषांसाठी सुलभ स्वच्छतागृह बांधणेकामी येणा-या सुमारे 40 लाख 34 हजार 468 बलदेवनगर झोपडपट्टी, पिंपरी येथे अस्तित्वातील जूने सार्वजनिक शौचालय पाडून तेथे नविन 16 सीट्सचे सुलभ शौचालय बांधणेकामी येणा-या सुमारे 36 लाख 28 हजार 911 रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. 2 मोशी जाधववाडी शिवेवरील विकास आराखड्यातील 24 मी.डी.पी. रस्ता विकसित करणेकामी येणा-या सुमारे 3 कोटी 33 लाख 71 हजार 307 रुपयांच्या खर्चास, काळेवाडी फाटा येथे व वाकड कस्पटेवस्ती ते पिंपरी काळेवाडी ग्रेड सेपरेटर बांधणे या कामांतर्गत विद्युत विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे 1 कोटी 86 हजार 430 रुपयांच्या खर्चास, BRTS कॉरीडोर क्र. 3 वर सुदर्शन नगर चौक येथे ग्रेडसेपरेटर बांधणेकामी या कामांतर्गत विद्युत विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे 1 कोटी 27 लाख 64 हजार 62 रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. 15 मध्ये चाफेकर चौकात पादचा-यांसाठी भुयारी मार्ग विकसित करणे कामांतर्गत येणा-या सुमारे 1 कोटी 40 लाख 26 हजार रुपयांच्या खर्चास, विषय क्र. 50 प्रभाग क्र. 3 मधील आदर्शनगर डी.पी. रस्ता विकसित करणे या विकसित करणे या रस्त्यावर विद्युत विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे 67 लाख 61 हजार 158 रुपयांच्या खर्चास, मनपातील अ,ब,ई व फ मैलाशिधीक्र्ण केंद्रामध्ये स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे 75 लाख 83 हजार 312 रुपयांच्या खर्चास, बोपखेल येथील मनपाच्या आरक्षित जागेत उद्यान विकसित करणेकामी येणा-या सुमारे 31 लाख 72 हजार 731 रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

अ-क्षेत्रीय कार्यालय इमारतीच्या आवारात उद्वाहक बसविणे व अनुषंगिक कामे करणेकामी येणा-या सुमारे 28 लाख 57 हजार 584 रुपयांच्या खर्चास, थेरगाव एम.एस. गुरुत्ववाहिनीची देखभाल दुरुस्ती करणेकामी येणा-या सुमारे 34 लाख 19 हजार 578 रुपयांच्या खर्चास, जलशुद्धीकरण केंद्र से.23 करिता 1199 मे.टन लिक्विड वायू खरेदीकामी येणा-या सुमारे 1 कोटी 52 लाख 87 हजार 250 रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.