Aarogya Setu अ‍ॅपच्या ‘प्रायव्हसी’ पॉलिसीमध्ये आलं अपडेट, जाणून घ्या काय झाले बदल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – COVID-19 कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग अ‍ॅप आरोग्य सेतु याच्या सेवा, अटी व गोपनीयता पॉलिसीमध्ये बदल केले गेले आहे. आरोग्य सेतू अ‍ॅप उघडताच आपल्याला सेवेच्या आणि गोपनीयतेच्या बाबतीत बदल होणारा संदेश प्राप्त होईल. ते स्वीकारल्यानंतर आपण पुन्हा हे अ‍ॅप वापरण्यास सक्षम असाल. सुधारित सेवेच्या अटी स्वीकारणे सर्व युजर्ससाठी अनिवार्य आहे. मागील महिन्यात 2 एप्रिल रोजी केंद्र सरकारने सुरू केलेल्या या कोरोना व्हायरस संपर्क ट्रेसिंग अ‍ॅपमध्ये 7 नवीन सेवा अटी आणि गोपनीयता पॉलिसी जोडल्या गेल्या आहेत.

नवीन पॉलिसी बदलांमध्ये, आता युजर्सला या अ‍ॅपमधून निलंबित केले जाणार नाही. चला, सेवा अटी आणि गोपनीयता वैशिष्ट्यांमधील नवीन बदलांविषयी जाणून घेऊया..

जर युजर्स या अ‍ॅपची सेवा कालावधी पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास त्यांना अ‍ॅपमधून निलंबित केले जाणार नाही.
सुविधा सेवा आणि ई-पास वैशिष्ट्यासाठी रीफ्रेश दिले गेले आहे.
फोन सोबत न ठेवता होणाऱ्या कॉन्सिक्वेंसेज स्पष्टीकरणाची तरतूद देण्यात आली आहे.
रिव्हर्स इंजिनियरिंग आणि टैम्परिंग रिस्ट्रीक्शनला हटवण्यात आले आहे
हे स्पष्ट केले गेले आहे की, जर तुम्ही या अ‍ॅपला आपल्या स्मार्टफोनमधून हटविले किंवा काढून टाकल्यास आपण त्यातील सेवांचा लाभ घेऊ शकणार नाही.
सरकारने घेतलेल्या काही अ‍ॅक्शन आणि डिस्क्लेमर्सला जोडले गेले आहे.
डिफेक्ट रिपोर्टिंग करण्यासाठी संपर्क माहिती वैशिष्ट्य जोडले गेले आहे.

सध्या भारतात हे अ‍ॅप वापरणारे सुमारे 11 कोटी युजर्स आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी हवाई किंवा रेल्वेने प्रवास करणार्‍या युजर्ससाठी हे अ‍ॅप अनिवार्य केले आहे. या अ‍ॅपशिवाय आपण विमानतळावर प्रवेश करू शकणार नाही. इतकेच नव्हे तर खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचार्‍यांना हे अ‍ॅप अनिवार्य केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like