TikTok शी स्पर्धा करण्यासाठी Facebook लाँच करणार शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अ‍ॅप Collab

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फेसबुकची न्यू प्रॉडक्ट एक्सप्रिमेंटेशन (एनपीई) टीम एक शार्ट-व्हिडिओ म्युजिक मेकिंग अ‍ॅप कोलॅबची टेस्टींग करत आहे. जे लवकरच लाँच होऊ शकते. हे सध्या बीटा आवृत्ती अ‍ॅप असेल, जेथे युजर्स मित्रांसोबत मिळून मिक्सिंग म्युजिक व्हिडिओ बनवू शकतील. सोबतच आपले स्वत:चे व्हिडिओ मिक्स आणि मॅच करू शकतील. याशिवाय फॅन्स सोबत अनेक प्रकारचे म्युजिक व्हिडिओ क्रिएट करू शकतील. याची खासीयत म्हणजे यासाठी तुम्हाला म्युजिकल अनुभवाची गरज नाही. हे एकदम चीनी शॉर्ट व्हिडिओ मेकिंग प्लॅटफॉर्म मेकिंग टीक-टॉक अ‍ॅप सारखे असेल.

फेसबुकच्या एनपीई टीमने म्हटले की, कोलॅब अ‍ॅप कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमध्ये लोकांमधील क्रिएटीव्हीटी अनलॉक करण्याच्या हेतूने डिझाईन केले आहे. कोलॅब अ‍ॅपमध्ये अनेक व्हिडिओ मिक्स करून एक व्हर्टिकल व्हिडिओ म्युजिक तयार करता येईल. युजर्स या अ‍ॅप्लिकेशनमध्ये आपली स्वत:ची रेकॉर्डींग जोडू शकतात आणि आपली स्वत:ची अ‍ॅरेजमेन्ट करू शकतात. टिकटॉक प्रमाणेच फीचरमध्ये जेव्हा तुम्ही एक कोलॅब क्रिएट करता, तेव्हा तुम्ही त्यास पब्लिश करू शकता, जेणेकरून अन्य लोक ते पाहण्यासोबतच दुसरा व्हिडिओ मॅच करून आणखी एक व्हिडिओ कंटेन्ट बनवू शकतात. सोबतच युजर्स इंस्टाग्राम, फेसबुक आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची स्टोरी म्हणून शेयर सुद्धा करू शकतात.

कोलॅब अ‍ॅपचा वापर करण्यासाठी आयओएस यूजर्सना
https://npe.fb.com/collab. वर Sign Up करावे लागेल. यासाठी युजर्सना आपले नाव, वय, ईमेल सबमीट करावे लागेल. यानंतर Join the Waitlist वर क्लिक केल्यानंतर तुमचे Collab अकाऊंट तयार होईल. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत मिळून म्युजिक व्हिडिओ बनवू शकता. फेसबुकने म्हटले की, सध्या हे म्युजिक मेकिंग अ‍ॅप अमेरिका आणि कॅनडासाठी असेल. जर फेसबुकचा हा प्रयोग यशस्वी झाला, तर ते जगातील इतर देशांसाठी सुद्धा लाँच केला जाऊ शकतो.