Shramik Bandhu अ‍ॅप लॉन्च, प्रवासी आणि मजुरांना रोजगार शोधण्यास मिळेल मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संक्रमण काळात केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील लोकांना मोठा त्रास सहन करावा लागला. भारतात कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे रोजगाराच्या परिस्थितीत पूर्णपणे बदल झाला आहे. देशातील 40 दशलक्षाहून अधिक लोकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या. कामाअभावी कंपन्या आपले कर्मचारी कमी करत आहेत. रोजगारा अभावी देशातील जनतेच्या रोजीरोटीवर विपरीत परिणाम झाला आहे. पण आता सर्व परिस्थिती हळूहळू परत रुळावर येत आहे. स्थलांतर करणार्‍यांनी आणि दैनंदिन मजुरांनी पुन्हा कामाचा शोध सुरू केला आहे आणि त्यांना हे ‘श्रमिक बंधू अ‍ॅप’ मदत करेल. या अ‍ॅपच्या मदतीने स्थलांतरित आणि दैनंदिन मजुरांना रोजगार मिळू शकेल.

ई-मोबिलिटी, दिल्लीचे सह-संस्थापक विकास बन्सल यांनी, प्रिस्टेकचे संचालक शैलेश डांगवाल यांच्यासमवेत कोरोनामुळे बेरोजगारीचा सामना करणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी ‘श्रमिक बंधू अ‍ॅप सुरू केले आहे. हे अ‍ॅप सर्व कुशल आणि अकुशल कामगारांना रोजगार शोधण्यात मदत करेल. विशेष गोष्ट अशी आहे की यात कोणत्याही एक श्रेणीचा समावेश नसून त्यात उत्पादन, बांधकाम, रुग्णालय, परिधान, चामडे, इलेक्ट्रिकल, स्टील आणि ऑटोमोबाईल क्षेत्र यासारख्या अनेक प्रकारांचा समावेश आहे. यामध्ये कामगार आणि रोजंदारीवर काम करणारे कामगार, चिनाई करणारे, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, घरगुती मदत, गार्डनर्स आणि ड्रायव्हर्स नोकरी शोधू शकतात.

अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी ‘श्रमिक बंधू अ‍ॅप’ गुगल प्ले स्टोअरवर विनामूल्य डाउनलोडसाठी उपलब्ध आहे. त्याचा लाभ देशभरात कोठेही मिळू शकतो. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामुळे कामगारांना त्यांच्या कौशल्यांच्या आणि स्थानाच्या आधारे रोजगार मिळण्यास मदत होईल. याचा अर्थ असा की आपण आपल्या देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात हा अ‍ॅप वापरुन त्या क्षेत्रातील कामगार शोधू शकता.