Google नं ToTok ला ‘प्ले स्टोअर’ वरून काढलं, युजर्सची माहिती चोरत होतं App

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Google ने आपल्या प्लॅटफॉर्मवरुन एक लोकप्रिय मेसेंजिंग अ‍ॅप ToTok काढून टाकले आहे. कंपनीने हे पाऊल यासाठी उचलले कारण संयुक्त अरब अमीरात सरकारद्वारे याचा वापर यूजर्सवर देखरेख करण्यासाठी केला जात होता. हे Apple अ‍ॅप स्टोअरवरुन Google Play Store वरुन डिसेंबरमध्ये हटवण्यात आले होते. ज्या कोणत्याही यूजर्सने हे अ‍ॅप आपल्या फोनमध्ये इंस्टॉल केले होते त्यांची माहिती ट्रॅक होत होती.

9to5Google च्या एका रिपोर्टनुसार Google ने आपल्या प्ले स्टोरमधून हे अ‍ॅप हटवले आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांच्या मते या अ‍ॅपचे मिडल ईस्ट, अशिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेत अनेक डाऊनलोडर आहेत. तर अ‍ॅप रँकिंग आणि App Annie च्या मते मागील आठवड्यात हे अ‍ॅप अमेरिकेत सर्वात जास्तवेळा डाऊनलोड करण्यात आले आहे.

न्यूयॉर्कमधील एका फर्मच्या तपासानुसार कळाले होते की हे अ‍ॅप बनवणारी कंपनी Breej Holding आहे. अहवालात समोर आले की ही कंपनी DarkMatter सह मिळून काम करत होती. DarkMatter अबुधाबी स्थित एक सायबर इंटेलिजेंस आणि हॅकिंग फर्म आहे, जी पहिल्यापासूनच सायबर क्राइममुळे FBI च्या चौकशीमध्ये अडकली आहे.

यापूर्वी एक अहवाल समोर आला होता, ज्यात म्हणले होते की Google ने आपल्या प्लॅटफॉर्मवरुन 1.9 बिलियन अ‍ॅप्स हटवले होते. 2019 मध्ये गुगलने 190 कोटीपेक्षा जास्त मालवेअर अ‍ॅप हटवले होते. या प्रकारचे अ‍ॅप नॉन गुगल अ‍ॅप स्टोअरवर, ऑनलाइन गेम्बलिंग आणि वेबसाइटद्वारे इंस्टॉल केले जातात.

You might also like