आता लवकरच WhatsApp वर ‘डार्क मोड’सह ‘हे’ ५ नवीन फिचर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हाट्सअ‍ॅप युजर्ससाठी आता लवकरच नवीन फीचर्स येणार आहेत. यामुळे आता तुमचे व्हाट्सअ‍ॅप वापरण्याची पद्धत बदलणार आहे. यामधील अनेक फीचर्सचा युजर्स मागील अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. यामध्ये डार्क मोड, क्विक एडिट, स्टेटस म्यूट यांसारख्या नवीन फीचर्सचा समावेश आहे. युजर्सच्या मागणीमुळे कंपनी या फीचर्सवर काम करत असून लवकरच हे फीचर्स तुम्हाला वापरायला मिळणार आहेत. यातील काही फीचर्स कंपनीने बीटा वर्जन मध्ये उपलब्ध करून दिले होते.

हे आहेत पुढील ५ फीचर्स

१) डार्क मोड

व्हाट्सअ‍ॅपचे हे मोस्ट अ‍ॅंटिसिपेटेड फीचर्स सांगितले जात आहे. या फीचर्सला फेसबुक मॅसेंजर साठी तयार करण्यात आले आहे. त्याचबरोबर यू-ट्यूब साठी देखील या फीचरचा वापर केला जात आहे. अ‍ॅंड्रॉइड आणि आयओएसच्या बीटा व्हर्जन मध्ये आधीपासूनच हे फिचर उपलब्ध आहे. लवकरच याला मेन व्हर्जनसाठी देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे. रात्री या फीचरचा मोठा फायदा होणार असून यामुळे तुमच्या डोळ्यांना त्रास कमी होणार आहे.

२)क्विक एडिट मीडिया शॉर्टकट

या फिचरवर देखील व्हाट्सअ‍ॅप अनेक दिवसांपासून काम करत आहे. यामुळे तुमचं चॅटिंग एक्सपीरियंस इम्प्रूव्ह होणार आहे. यामुळे तुम्ही पाठवलेली मीडिया फाईल किंवा आलेली फाईल तुम्ही चॅटमधूनच डिलीट करू शकता.

३)पेमेंट फीचर

या फिचरची टेस्टिंग मागील अनेक दिवसांपासून मोजक्याच ग्राहकांच्या अ‍ॅपवर केली जात आहे. मागील अनेक वर्षांपासून या फीचरची वाट पहिली जात आहे. मात्र भारत सरकारने सुरक्षेच्या हेतूने कंपनीला या फीचरची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे कंपनी नवीन रिपोर्ट तयार करून रिझर्व्ह बँकेला पाठवणार आहे. त्यानंतर बँकेने परवानगी दिल्यास लवकरच ही सेवा मिळू शकते.

४)QR Code स्कॅनर

या फीचरला लवकरच व्हाट्सअ‍ॅपशी जोडलं जाईल. याद्वारे तुम्ही कोणत्याही क्रमांकाला सहज व्हाट्सअ‍ॅपशी जोडू शकता. या फीचरद्वारे तुम्ही हे सहजरित्या करू शकता.

५)हाइड म्यूट स्टेटस

या फीचरच्या मदतीने तुम्ही स्टेटस फीडला तुमच्या व्हाट्सअ‍ॅप लिस्ट मधून हटवू शकता. सध्या तुम्ही कोणत्याही मित्राचे किंवा क्रमांकाचे स्टेटस पाहू शकता.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like