APSC : 577 पदांची भरती अन् मिळणार 1,10,000 पर्यंत पगार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    आसाम लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून अभियंत्यांच्या ५०० हुन अधिक पदांवर अर्ज भरण्यासाठी मागवण्यात आले आहेत. त्या भरतीची आज शेवटची तारीख म्हणजेच ८ सप्टेंबर २०२० आहे. निवडलेल्या उमेदवारास दरमहा १,१०,००० रुपयांपर्यंत पगार भेटू शकतो. या भरतीची अंतिम तारीख तीन वेळा वाढवण्यात आली होती. यापूर्वी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जुलै २०२० रोजी निश्चित केली होती, नंतर ती १७ ऑगस्ट आणि त्यानंतर २४ ऑगस्ट करण्यात आलेली. परत तिसऱ्यांदा मुदतवाढ देवून अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ सप्टेंबर करण्यात आली.

पगार आणि ठिकाण

– कनिष्ठ अभियंता (JE, CIVIL) पदांसाठी ३४४ जागांवर अर्ज मागवण्यात आलेत. त्यामाध्यमातून उमेदवारास १४,००० ते ६०,५०० रुपये पर्यंत पगार प्राप्त होवू शकतो. त्यांचे ग्रेड वेतन दरमहा ८७०० रुपये असेल.

– सहाय्यक अभियंता (AE, CIVIL) २२२ पदांसाठी अर्ज मागण्यात आले आहेत. त्याअंतर्गत उमेदवारांना दरमहा ३०,००० ते १,१०,००० रुपये पगार मिळेल त्यांचे ग्रेड वेतन दरमहा १२,७०० रुपये असेल.

– तसेच सहाय्यक आर्किटेस्टसाठी ११ जागा रिक्त आहेत, त्यासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ३०,००० ते १,१०,००० रुपये पगार मिळेल. त्यांचे ग्रेड वेतन दरमहा १२,७०० रुपये असेल.

पदांची माहिती आणि पात्रता

>> कनिष्ठ अभियंता (JE) साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शासकीय मान्यताप्राप्त संस्थेकडून सिव्हिल इंजिनीरिंग मध्ये ३ वर्षाचा डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे.

>> सहाय्यक अभियंता (AE) साठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीरिंगमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे.

>> सहाय्यक आर्किटेक्टसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून आर्किटेक्चरमध्ये पदव्युत्तर पदवी असणे गरजेचं आहे.

अर्ज फी

एससी/एसटी/ओबीसी/एमओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना १५० रुपये अर्ज फी द्यावी लागेल. तसेच सामान्य श्रेणीतील उमेदवारांना २५० रुपये अर्ज फी भरावी लागेल.

कश्या पद्धतीने होईल निवड प्रक्रिया ?

उमेदवारांना एपीएससी कनिष्ठ अभियंता भरती २०२० अंतर्गत निवड प्रक्रियेचा एक भाग म्हणून लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. नंतर त्यांना मुलाखतीतून जावे लागेल.