Apurva Nemlekar | बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच अपूर्वा नेमळेकरने महेश मांजरेकरांबाबत केले ‘हे’ धक्कादायक विधान

पोलीसनामा ऑनलाईन : Apurva Nemlekar | ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाने गेल्याच आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला. अक्षय केळकरने यंदाच्या पर्वाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. पण ‘बिग बॉस मराठी सिझन 4’ या मध्ये अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) सगळ्यात जास्त चर्चेत राहिली. शोची विजेती ठरली नसली तरी चर्चा मात्र सर्वाधिक अपूर्वाचीच रंगली.

अपूर्वाने अनेक मालिका व नाटकांत काम केलं आहे. ‘आभास हा’ या मालिकेतून छोट्या पडद्यावरती एन्ट्री घेतलेली अपूर्वा तिच्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील शेवंता या व्यक्तिरेखेमुळे चर्चेत आली. बिग बॉस नंतर तिच्या चाहत्यांच्या संख्येत दुपटीनं वाढ झालीय. जसं बिग बॉसच्या घरात जाताना म्हणाली होती तशीच ती 100 दिवस घरात वागली…जशी आहे तशी…

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच अपूर्वाने (Apurva Nemlekar) दिलेल्या मुलाखतीत अपूर्वाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य केलं आहे. “मी ज्याप्रकारे हा खेळ खेळले, त्याचा मला आनंद आहे. माझा खेळ स्ट्रॉंग व चांगला होता. घरातील इतर सदस्यांसाठी मी स्ट्रॉंग स्पर्धक होते. त्यांच्याशी मी उत्तम स्पर्धा करू शकले, याचा मला अभिमान आहे”, असं अपूर्वा म्हणाली. पुढे अपूर्वा बिग बॉस सीझन 4 चे होस्ट महेश मांजरेकर यांच्याबाबत सांगताना म्हणाली कि “होस्ट महेश मांजरेकरांनी दिलेल्या सगळ्या सूचनांचं पालन न करता मी माझा खेळ खेळले. जे सदस्य मांजरेकरांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे वागले, ते सगळ्यात आधी घराबाहेर पडले”.

Web Title :- Apurva Nemlekar | bigg boss marathi 4 apurva nemlekar talks about host mahesh manajrekar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Punit Balan Celebrity League (PBCL) | दुसरी ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ क्रिकेट स्पर्धा; तोरणा लायन्स्, पन्हाळा जॅग्वॉर्स संघांची विजयाची हॅट्रीक !!

Sanjay Raut | महाविकास आघाडीतील समन्वयाबद्दल खासदार संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

Ajit Pawar | नाशिक पदवीधर मतदासंघातील उमेदवारीबाबत अजित पवार यांनी केले मोठे भाष्य; म्हणाले…