…म्हणून अपुर्वाने केला रोहित शेखरचा गळा दाबून खून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी मुख्यमंत्री एन. डी तिवारी यांचा मुलगा रोहित शेखऱ याचा खून केल्याप्रकऱणी त्याची पत्नी अपुर्वा तिवारी हिला अटक केली आहे. तिने रोहित शेखरचा खून का केला याचा उलगडा झाला आहे. रोहितच्या दारूच्या व्यसनामुळे दोघांचे संबंध ताणले होते. त्यामुळे तिने रोहितच्या हत्येचा कट रचून गळा दाबून खून केला. असे तपासात समोर आले आहे.

१६ एप्रिल रोजी रोहित शेखर याचा मृतदेह संशयास्पदरित्या मिळाला होता. त्याचा गळा दाबून खून केल्याचं निष्पन्न झाले होते. यात रोहित शेखरच्या आईने अपुर्वा आणि रोहितचे संबंध चांगले नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर संशयाची सूई त्याच्या पत्नीवर फिरत होती. पोलिसांनी अपुर्वाची शनिवारपासून चौकशी सुरु केली होती. त्यानंतर तिने खून केल्याची कबूली दिली. लग्नापासूनच दोघांचे संबंध ताणले गेले होते. त्यानंतर त्याच्या दारूच्या व्यसनामुळे तिने खून केल्याचे तपासात समोर आले आहे.

दरम्यान, त्या दिवशी रोहितची आई उज्ज्वला साकेत भागातील मॅक्स रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी गेल्या होत्या. त्यावेळीच त्यांना घरातील नोकर आणि दुसरा मुलगा सिध्दार्थने फोन करून रोहितच्या नाकातून रक्त येत असून तो निपचित पडला असल्याचे सांगितले.