APY | ‘या’ सरकारी योजनेत पती-पत्नी दोघांना मिळेल रक्कम, दर महिना कमावू शकता 10,000 रुपये; जाणून घ्या कसे?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – APY | सध्या भविष्याच्या चिंतेने प्रत्येकजण चिंतेत आहे. यासाठी अनेकजण गुंतवणुकीच्या काही पद्धती अवलंबतात जेणेकरून वृद्धापकाळात चांगला निधी मिळू शकतो. लोक ज्या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करतात, तिची सुरक्षितता देखील तपासतात. सेवानिवृत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (atal pension yojana) गुंतवणूक करू शकता. योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे पती-पत्नी दोघांनाही दर महिन्याला पैसे मिळू शकतात. ही एक पेन्शन योजना आहे, जी लोकांना महिन्याच्या खर्चापासून दिलासा देते. (APY)
काय आहे अटल पेन्शन योजना? (Atal Pension Yojana- APY)
अटल पेन्शन योजना ही सरकारने सुरू केलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे. त्याचा लाभ भारतातील सर्व नागरिकांना वयाच्या ६० वर्षांनंतर दिला जातो. हे नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) च्या फ्रेमवर्कवर आधारित आहे.
APY अंतर्गत, ग्राहकांना प्रत्येक महिन्याला 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये आणि 5000 रुपये घेण्याचा पर्याय आहे. जर तुम्हाला यामध्ये नोंदणी करायची असेल तर तुमच्याकडे बचत खाते, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.
या योजनेसाठी कोण आहेत पात्र
अटल पेन्शन योजनेंतर्गत, 18 ते 40 वर्षे वयाचा कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो आणि पेन्शन योजनेचा लाभ मिळवू शकतो. खाते उघडण्यासाठी किंवा या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा बँकेशी संपर्क साधावा लागेल. या योजनेचा लाभ वयाच्या ६० व्या वर्षी दिला जातो. या अंतर्गत पती-पत्नी दोघेही स्वतंत्र खाते उघडून लाभ मिळवू शकतात.
या योजनेचे लाभ आणि फायदे
योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्ही यामध्ये जितक्या लवकर गुंतवणूक कराल तितका जास्त फायदा तुम्हाला मिळेल. जर एखादी व्यक्ती वयाच्या 18 व्या वर्षी अटल पेन्शन योजनेत सामील झाली, तर वयाच्या 60 व्या वर्षी त्याला दरमहा 5000 रुपये मासिक पेन्शनसाठी दरमहा फक्त 210 रुपये जमा करावे लागतील.
या अंतर्गत गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास, पैसे नॉमिनीला परत केले जातात. किंवा कुटुंबातील सदस्यांची इच्छा असल्यास ही योजना सुरू ठेवून पत्नी आणि मुलांना पेन्शनचा लाभ मिळू शकतो. अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना आयकर कायदा 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर लाभ दिले जातात.
कशी मिळवाल 10 हजार पेन्शन
39 वर्षापेक्षा कमी वयाचे पती-पत्नी वेगवेगळे या योजनेत गुंतवणुक करून लाभ घेऊ शकतात,
ज्यामुळे त्यांना 60 वर्षाच्या वयानंतर संयुक्त प्रकारे दर महिना 10,000 रुपयांची पेन्शन (Pension) दिली जाईल.
जर पती आणि पत्नी ज्याचे वय 30 वर्ष किंवा यापेक्षा कमी आहे, आपआपल्या एपीवाय खात्यात दर महिना 577 रुपये,
वय 35 व्या वर्षापासून दरमहा 902 रुपये गुंतवणूक केली तर त्यांना 10 हजारची गॅरेंटेड मंथली पेन्शन तसेच
दोघांपैकी एकाचा मृत्यू झाल्यास 8.5 लाख रुपये मिळतील.
Web Title :- APY | husband and wife will get 10000 rupees every month in atal pension yojana government scheme
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update