फायद्याची गोष्ट ! दररोज फक्त 7 रूपयांची ‘गुंतवणुक’ अन् दरमहा होईल 5 हजारांची ‘बचत’, टॅक्समध्ये देखील मिळणार ‘सूट’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही दर महिन्याला ५००० रुपयांची सेव्हिंग करू शकता त्यासाठी तुम्हाला दररोज ७ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
लाखो-कोट्यवधी लोक केंद्राच्या या योजनेतून आतापर्यंत जोडले गेले आहेत.
या योजनेशी जोडून तुमचं भविष्य सुरक्षित होईल, तर तुम्ही पेन्शनचेही हक्कदार व्हाल.
तर आपण पाहू या योजनेशी कसं जोडता येईल.. आणि या योजनेचे फायदे…

अटल पेन्शन योजना (APY Scheme) –
अटल पेन्शन योजना (APY Scheme) असं या योजनेचं नाव आहे.
केंद्र सरकारकडून २०१५ मध्ये अटल पेन्शन योजना (APY Scheme) सुरू करण्यात आली.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे आणि कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट असणं, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर असणं अत्यावश्यक आहे.
सेवानिवृत्तीनंतर पेन्शन लाभ प्रदान करणं आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या १८ ते ४० वर्ष वयोगटातील लोकांचं भविष्य सुरक्षित करणं हा या योजनेचा हेतू आहे.

दर महिन्याला गुंतवणुकीनुसार मिळेल पेन्शन –
नियमानुसार, या योजनेत जमा करण्यात येणारा पैसा तुम्हाला ६० वर्षानंतर पेन्शन रुपात मिळणं सुरू होईल.
पेन्शनची रक्कम १००० रुपये, २००० रुपये, ३००० रुपये, ४००० रुपये आणि अधिकाधिक ५००० रुपये इतकी असू शकते. पेन्शन रुपात मिळणारा पैसा तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून आहे.

जर तुम्हाला वयाच्या ६० वर्षानंतर, ५००० रुपये महिन्याचं पेन्शन हवं असेल, तर तुम्हाला दर महिन्याला २१० रुपये जमा करावे लागतील. याचा अर्थ दररोजच्या हिशोबाने तुम्ही ७ रुपयांची गुंतवणूक करता.

तसंच जर १००० रुपये महिन्याला पेन्शन हवं असेल, तर दर महिन्याला केवळ ४२ रुपये

२००० रुपये पेन्शन हवं असल्यास, दर महिन्याला ८४ रुपये

३००० रुपये मासिक पेन्शनसाठी १२६ रुपये आणि

४००० रुपये पेन्शनसाठी १६८ रुपये दर महिना भरावे लागतील.

अटल पेन्शन योजनेशी जोडलेल्या सर्व टॅक्सपेअर्सला इनकम टॅक्स ॲक्ट 80 C अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत टॅक्स बेनिफिट (Tax Benefit) मिळतो.
त्याशिवाय स्पेशल प्रकरणात ५०००० रुपयांपर्यंत अतिरिक्त टॅक्स बेनिफिट मिळतो.

वेळेआधीच मृत्यू झाल्यास पेन्शन पत्नीला मिळेल –
जर एखाद्या व्यक्तीने अटल पेन्शन योजनेत रजिस्ट्रेशन केलं असेल आणि पेन्शन सुरू होण्याआधीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास,
त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीची पत्नी डिफॉल्ट रुपात नॉमिनी होते.
पत्नीला योजनेचे संपूर्ण फायदे मिळतील. त्या व्यक्तीचं पेन्शन त्याच्या पत्नीच्या नावे दिलं जाईल. पत्नी हयात नसल्यास, त्या व्यक्तीने ज्याला नॉमिनी ठेवलं आहे, त्याला संपूर्ण फायदे मिळतील.
या योजनेत तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत.

Also Read This : 

IBPS RRB PO/Clerk Notification 2021 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

 

Bribery | लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत