सारा अली खान बनारसच्या गल्ल्यांमध्ये फिरताना दिसली (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार सारा अली खान सध्या बनारसमध्ये आहे. सारा वाराणसीमध्ये आपल्या अपकमिंग सिनेमाची शुटींग करत आहे. आनंद एल रायच्या या सिनेमात सारा अली खान सोबत अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुषही काम करत आहेत. धनुषही सध्या वाराणसीत अक्षय कुमार त्यांना नंतर जॉईन करणार आहे.

शुटींगमधून ब्रेक घेत सारा अली खान विश्वानात मंदिरात गेली गेली होती. सारा मंदिराच्या बाजूला असणाऱ्या गल्लींमध्येही फिरताना दिसली. तिनं काही दुकानांमधून तिचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे. व्हिडीओत सारा बांगड्यांच्या दुकानापासून तर दुधाचं दुकान आणि बाईक वाल्यांपाशीही दिसत आहे. सारा फुल मस्तीच्या मु़डमध्ये दिसत होती. सारानं व्हिडीओच्या शेवटी सांगितलं की, ती बांगड्या खरेदी करण्यासाठी जाणार आहे.

सारानं अलीकडे होळीही साजरी केली. कुटुंबीयांपासून दूर तिनं बनारसमध्येच होळीचा आनंद घेतला. सारानं तिचा होळी एन्जॉय करतानाचा व्हिडीओदेखील इंस्टावरून शेअर केला होता.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच ती लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यानंतर आता ती कुली नंबर वन या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन असणार आहे. याशिवाय सारा अतरंगी रे या सिनेमातही काम करत आहे. सध्या सिनेमाची शुटींग सुरू आहे.