Aranyeshwar Pune Crime | पुणे : चेष्टामस्करीत तरुणाला पेट्रोल टाकून पेटवले, दोघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Aranyeshwar Pune Crime | चेष्टामस्करीत एका तरुणाच्या पायावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना पुण्यातील अरण्येश्वर परिसरात घडली आहे. या घटनेत तरुण जखमी झाला असून घटनेनंतर आरोपी पळून गेले. हा प्रकार 18 एप्रिल रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास अण्णाभाऊ साठेनगर, अरण्येश्वर रोड (Sathe Nagar Aranyeshwar Road) येथे घडला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police) दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

बापू जालिंदर खिलारे (वय-30 रा. अण्णाभाऊ साठे नगर, अरण्येश्वर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने गुरुवारी (दि.25) सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन शुभम पवार आणि मयुर भुंबे (दोघे रा. अरण्येश्वर, पुणे) यांच्यावर आयपीसी 324, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
18 एप्रिल रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास बापू खिलारे हे कामावरुन घरी जात होते.
त्यावेळी अरणेश्वर रोडवर त्यांच्या ओळखीचा अनिकेत कांबळे हा त्याच्या दुचाकीच्या टाकीत पाणी गेल्याने पेट्रोल आणि पाणी बाहेर काढत होता.
त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी थांबले होते. बापू खिलारे हे त्या ठिकाणी गेले. आरोपी आणि फिर्य़ादी एकमेकांची थट्टामस्करी करु लागले.

आरोपी शुभम याने माचिस मधील काडी पेटवून फिर्यादी यांच्या पायाला चटका देऊ लागला.
फिर्यादी यांना काहीच होत नसल्याचे पाहून आरोपी मयुर भुंबे याने बाटलीत काढलेले पेट्रोल बापु खिलारे याच्या पायावर टाकले.
तर शुभम याने पेटती काडी फिर्य़ादी यांच्या पायावर टाकली. यामुळे पेट्रोलने पेट घेतल्याने आग लागली.
त्याठिकाणी इतरांनी गोधडी टाकून आग विझवली. आग लागल्याचे पाहून आरोपी तेथून पळून गेले.
या घटनेत बापु खिलारे जखमी झाले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar Clean Chit | अजित पवारांना ‘कचाकचा’ क्लीनचीट, काल सुनेत्रा पवारांना तर आज दादांना दिलासा, निवडणूक आयोगाने म्हटले, ‘त्या’ वक्तव्यात…

SB Road Pune Crime | प्रेमसंबंध तोडून टाकल्याने तरुणीला मारहाण, सेनापती बापट रोडवरील घटना

Pune Congress News | ‘कट-कारस्थानांचा डीएनए’ हा भाजप’चा.. काँग्रेसचा नव्हे ..! ‘वारसा हक्क संपत्तीकर लावण्याचे मनसुबे २०१९साली भाजपचेच..!! – राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी

Rape Case Pune | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार