धक्कादायक ! प्रियकराची हत्या करून तिनं 7 तुकडे शेतात वेगवेगळ्या कोपऱ्यात फेकले, परिसरात प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रेम प्रकरणामुळे गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. बिहारमध्ये असाच प्रेमप्रकरणातून युवकाची निघृण हत्या करण्याचा प्रकार घडला आहे. गंभीर बाबा म्हणजे हत्येनंतर मृत तरुणाच्या शरीराचे तब्बल 7 तुकडे करण्यात आले आहेत. एखाद्या क्राईम सीरिअल पेक्षाही वाईटपद्दतीने हा खून केल्याचे समजत आहे. यामध्ये शरीराचे सात तुकडे केल्यानंतर त्याला शेतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आलं होतं.

अभिषेक असं हत्या केलेल्या प्रियकराचं नाव आहे. पोलिसांनी शेतामधून अभिषेकच्या शरीराचे 7 तुकडे सापडले. ज्यामध्ये त्याचे डोळे, पाय, हात, धड आणि शिर शरीरापासून वेगवेगळं करण्यात आलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम प्रकरणातून अभिषेकची निघृणरित्या हत्या करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नानंतरही सुरु होते प्रेमप्रकारण

अभिषेक आणि मुलगी एका कोचिंग क्लासमध्ये होते दोघांमध्ये प्रेम झाले, मात्र अचानक मुलीचे दुसऱ्या मुलाशी लग्न झाले. लग्न झाल्यानंतरही अभिषेक आणि तरुणीमध्ये संबंध होते. ते एकमेकांना भेटायचे. 17 ऑगस्ट रोजी मुलीने अभिषेकला रात्री 10 वाजता घरी बोलावलं होतं, त्यानंतर अभिषेक बेपत्ता झाला होता. 7 दिवसानंतर 24 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा अभिषेकचा मृतदेह शेतात सापडला. पोलिसांनी मुलीच्या घराजवळून एक किलोमीटर अंतरावर मृतदेह ताब्यात घेतला.

अभिषेकची आई रंभा देवी यांनी 17 ऑगस्टपासून अभिषेक बेपत्ता असल्याचा अहवाल राणीगंज पोलिस ठाण्यात दाखल केला. राणीगंज पोलीस ठाण्यात मुलीकडच्या 4 जणांवर कलम 363/365 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आरोपी कुटुंब घटना घडल्या दिवशीपासून फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या निघृण घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार

बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार

द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे

गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!

गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या

कोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या