महिलेला सर्वांसमोर जिवंत जाळलेला व्हिडिओ झाला ‘व्हायरल’, ‘ते’ चौघे गोत्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारच्या अररियामध्ये माणूसकीला लाजवेल अशी घटना घडली. मागील 8 ऑक्टोबरला राणीगंज ठाणे क्षेत्रात भोरडा बेलगच्छी भागात एका महिलेला जीवंत जाळण्यात आले. या घटनेत सजनी देवी नावाच्या एका महिलेला जीवंत जाळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर आहे. नवजात मुलाच्या हत्त्येच्या आरोपीत या महिलेला गावकऱ्यांकडून मारहाण करण्यात आली. त्यानंतर पुरावा लपवण्यासाठी तिला जाळण्यात आले.

माणूसकीला लाजवले अशा प्रकारे महिलेला मारहाण करण्यात आली. महिलेला एका लाकडाच्या खंबाला बांधून मारण्यात आले तर अनेकांनी तिला तेथेच जाळा असे सांगितले. व्हिडिओमध्ये हे स्पष्ट ऐकू येते. त्यानंतर पुरावा लपवण्यासाठी तिला जाळण्यात आले.

पहिल्यांदा मारहाण केली आणि त्यानंतर रॉकेल ओतून जाळले 
गावकऱ्यांना पहिल्यांदा काही दिवसांपूर्वी एका हरवलेल्या मुलांचा मृत देह सापडला, त्यानंतर मृत मुलाच्या नातेवाइकांनी आरोप लावले की सजनी देवीने मुलाला चोरले आणि हत्त्या केली. त्यानंतर गावकऱ्यांकडून संतापून महिलेला मारहाण करण्यात आली. यावेळी महिलेवर रॉकेल टाकून जाळण्यात आले.

यानंतर गावात तणावात्मक परिस्थिती आहे. यानंतर पोलीस गावात तैनात झाले आणि आरोपींना ताब्यात घेण्यासाठी छापे टाकले. पोलिसांच्या भीतीने गावकरी गाव सोडत आहेत. अररियाने SDPO कुमार देवेंद्र सिंह यांनी सांगितले की आता पर्यंत या संबंधित चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहेत.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like