बाॅलिवूडला धक्का…सट्टेबाजी प्रकरणी अरबाज नंतर आणखी एक मोठा मासा गळाला

ठाणे: पोलीसनामा आॅनलाईन

आयपीएल बेटींगप्रकरणी अभिनेता दिग्दर्शक अरबाझ खानचं नाव समोर आल्यावर पुन्हा एकदा बेटींग आणि बॉलिवूडचं कनेक्शन उघड झालं आहे. कित्येक सेलिब्रिटी बेटींगच्या विळख्यात फसल्याचं अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे. विशेष, म्हणजे पैशांसाठी नाही तर स्टेटस सिंबॉल म्हणून अनेक सेलिब्रिटी लाखो करोडोंचा सट्टा लावतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आता याप्रकरणी प्रसिद्ध चित्रपट निर्माता पराग संघवीला ठाने खंडणी विरोधी पथकाकडून समन्स बजावलं जाणार आहे. तसेच एका माजी पोलीस अधिकाऱ्यालाही समन्स पाठवलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पराग संघवीच्या चौकशीतून सट्टा लावणाऱ्या आणखी सेलिब्रिटींची नावं बाहेर येणार का, याची उत्सुकता आहे. दरम्यान बुकी सोनू जालानवर ठाणे नगर पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मसाले व्यवसायीकाला रवी पुजारी मार्फेत धमकी देऊन ३ कोटींचा फ्लाट आपल्या नावावर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका कोण आहे पराग संघवी

पराग संघवी हा प्रसिद्ध चित्रपट निर्माता असून, त्याने आत्तापर्यंत अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. सरकार, याद , पार्टनर यांसारख्या बहुचर्चीत चित्रपटांचाही समावेश आहे. पराग हा सोनूचा पार्टनर असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ठाणे खंडणी विरोधी पथक त्याला चाैकशीसाठी समन्स पाठवणार आहे. तसेच त्याचे अनेक माफियांशी देखील संबंध असल्याची शक्यता आहे.