धक्कादायक….अखेर अरबाज खानने दिली सट्टा लावल्याची कबुली

ठाणे : पोलिसनामा ऑनलाईन

बॉलीवूड अभिनेता अरबाज खान याने आयपीएल सामन्यांवर सट्टा लावण्याच्या संशयावरुन ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडुन अरबाज यास नोटीस पाठविण्यात आली होती. त्यानंतर आता अरबाज खानने आयरपीएल सामन्यांवर सट्टा लावल्याची कबुली दिली आहे. तसेच प्रसिध्द बुकी सोनु जलानच्या संपर्कात असल्याचेही त्याने यावेळी सांगितले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अरबाजने क्रिकेटच्या अनेक सामन्यांवर जलालकडे सट्टा लावला होता. आतापर्यंत दोन कोटी ८० लाखांचा सट्टा तो हरला आहे. काही दिवस त्याने पैसे दिले. मात्र, काही रक्कम त्याने दिलीच नाही. राहिलेली रक्कम मागण्यासाठी जलालने अरबाजकडे सतत तगादा लावला होता. त्यासाठी वारंवार त्यांचे फोनवरून आणि मध्यस्थांमार्फत बोलणेही झाले. मात्र अरबाज खान त्याला कोणताही प्रतिसाद देत नसल्यामुळे जलालने त्याला धमक्या देखील दिल्या होत्या.एवढेच नाही तर समाज माध्यमांवर अरबाज आणि बुकी सोनू जलाल यांचे फोटोही व्हायरल झाले होते.

याप्रकरणातील सर्वात धक्कादायक माहिती म्हणजे देशभरातील तब्बल 98 सट्टेबाज जललाच्या संपर्कात असल्याची माहिती या अगोदर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने केलेल्या चाैकशीत समोर आलं आहे. दरम्यान 27 मे रोजी आएपीएल क्रिकेटचा मुंबईच्या वानखेडे मैदानावर चेन्नई सुपरकिग्ज विरुद्ध सनराईज हैद्राबाद असा शेवटचा सामना होता. यावेळी सामन्यावर सट्टा लावण्यासाठी देशभरातील 98 बुकी जलालच्या संपर्कात होते. अशी माहिती त्याच्याच सहकार्यांकडून मिळाल्यानंतर पोलिसांनी 29 मे रोजी त्याला अटक केली.

अरबाजच्या सट्टेबाजीला कंटाळूनच मलायकाने दिला घटस्फोट !