मलायका करते अरबाजचा ‘तिरस्कार’ ? घटस्फोटानंतर ‘असं’ नातं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचे पुर्वीचे ‘लव कपल’ मानली जाणारी जोडी अभिनेत्री अरबाज खान-मलायका अरोडा यांचा घटस्फोट झाला आहे. लग्न तुटल्यानंतर दोघांनीही आपल्या नव्या जोडीदाराला शोधले आहे. अरबाज आणि मलायकाला एक मुलगा आहे. हे दोघे वेगळे झाले असून देखील आपल्या मुलाला पुर्ण वेळ देतात. याच दरम्यान एक चर्चा समोर आली आहे. अरजाब आणि मलायका यांचे नाते ठिक नाही. अरबाजने एका मुलाखतीमध्ये मलाकासोबतच्या नात्याबद्दल सांगितले.

अरबाजने सांगितले की, ‘आम्ही अनेक वर्ष सोबत होतो. आम्ही अनेक आठवणी जपून ठेवल्या आहेत. आम्हाला एक मुलगा ही आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांचा आदर करतो. आमच्यामध्ये असे काही झाले ज्यामुळे आम्हाला वेगळे व्हावे लागले.’

क्या मलाइका से नफरत करते हैं अरबाज खान, तलाक के बाद कैसे हैं दोनों के रिश्ते?

अरबाज पुढे म्हणाला की, ‘याचा अर्थ असा नाही की, आम्ही एकमेकांचा तिरस्कार करतो. आम्ही दोघे समजदार आहोत. आम्ही एकमेकांचा आदर करतो.’ अरबाजचे म्हणणे आहे की, मलायका अरोडाच्या परिवारासोबत त्याचे चांगले नाते आहे.

याआधीच्या मुलाखतीमध्ये अरबाजने सांगितले होते की, ‘एक वेळ अशी होती जेव्हा मी खूप चिंतेत होतो पण आता सगळे संपले. काही झाले तरी आपल्याला जीवनात पुढे जावे लागते.’

आपल्या मुलाबद्दल बोलताना अरबाजने सांगितले की, ‘तो चांगला मुलगा आहे. ज्याप्रकारे अरहानने पुर्ण प्रकरणाला हॅंडल केले मला खूप आवडले. तो पॉझिटिव्ह मुलगा आहे. तो स्पोर्ट्स, म्यूजिक आणि शिक्षणामध्ये हुशार आहे. त्याला खूप चांगल्या सवयी आहे आम्हाला त्याच्यावर गर्व आहे.’

क्या मलाइका से नफरत करते हैं अरबाज खान, तलाक के बाद कैसे हैं दोनों के रिश्ते?

लग्न तुटल्यानंतर अरबाज-मलायका आपल्या करिअरमध्ये पुढे गेले. मलायका सध्या बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. दोघे लवकरच लग्न करणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.

त्याचबरोबर अरबाज खान इटॅलिन मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. दोघे नेहमी स्पॉट होतात. सध्या अरबाज अनेक प्रोजेक्टमुळे व्यस्त आहे. याव्यतिरिक्त अरबाज साउथ चित्रपटात दिसून येत आहे. तो प्रिया वॉरियर, श्रीदेवी बंग्लो आणि मोहनलालसोबत ‘बिग ब्रदर’ मध्ये दिसून येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like