अखेर सिद्धू आऊट अर्चना इन 

मुंबई : वृत्तसंस्था – गेल्या अनेक वर्षांपासून नवज्योत सिंग सिद्धू कपिलच्या कॉमेडी ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये जज म्हणून दिसत आहे. पण आता या शोमध्ये जजच्या भूमिकेत सिद्धू ऐवजी अर्चना पूरनसिंग दिसून येणार आहे. कपिल आणि सिद्धू यांची जोडी शो मधून लोकप्रिय झाली होती. शोमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना शेरो शायरी करून सिद्धू खुश करत होते. पण पुलवामा हल्ल्यानंतर सिद्धूने पाकिस्तानची पाठराखण केली होती. त्यामुळे या शोमधून त्यांची हकालपट्टी केली आहे.

सिद्धू यांच्या खुर्चीवर अर्चना पूरन सिंग विराजमान झाल्यानंतर पुन्हा एकदा ‘द कपिल शर्मा शो’च्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. अर्चनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कपिल बरोबर सेटवरचा सेल्फी शेअर केला आहे. या आधी अर्चना पूरन सिंग ‘कॉमेडी सर्कस’ शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसली होती. तसेच अर्चनाने अनेक बॉलिवूड चित्रपटात कॉमेडी भूमिका साकारल्या आहे.

म्हणून शो मधून काढले सिद्धूला
पुलवामा हल्ल्याचा देशभरातून निषेध झाल्यानंतर सिद्धूंनी मात्र पाकिस्तानची पाठराखण केली होती. पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढावा असा सल्ला सिद्धूंनी दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावर नेटकऱ्यानी त्यांच्यावर जोरदार टीका केल्या होत्या त्यामुळे सोशल मीडियावर सिद्धूंना कपिल शर्मा शोमधून काढून टाकण्याची मागणी प्रेक्षकांनी केली होती. यावर ठोस निर्णय घेत वाहिनीनं सिद्धू यांना शोमधून काढून टाकलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like