…म्हणून ‘तिने’ अनुपम खैरला ‘kiss’ करण्यास दिला होता नकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘द कपिल शर्मा’ च्या शोमध्ये नवजोत सिंह सिद्धूच्या जागेवर जजच्या रुपात असणारी अर्चना पूरन सिंहने खुप वर्षानंतर आपल्या एका चित्रपट ‘लडाई’ चा खुलासा केला. दीपक शिवदासानी द्वारे निर्देशित या चित्रपटामध्ये अभिनेते मिथून चक्रवर्ती आणि अभिनेत्री रेखाने मुख्य भूमिकेत काम केले होते.

या व्यतिरिक्त चित्रपटात अभिनेत्री अर्चना पूरन सिंह आणि अभिनेते अनुपम खैर यांनी सुद्धा चित्रपटात काम केले. याबद्दल अर्चनाने आश्चर्यचकीत होण्यासारखी एक गोष्ट सांगितली. अर्चनाने सांगितले की, चित्रपटात निर्देशकने माझा अनुपम खैरसोबत किसिंगचा सीन ठेवला होता. जेव्हा ही गोष्ट अर्चनाला समजली त्यावेळी ती खूप घाबरली.

अर्चनाने सांगितले की, आम्ही जेव्हा शुटिंग करत होतो. दीपकने माझा अनुपम खैर यांच्यासोबत किसिंग सीन ठेवला. जेव्हा मला हे कळाले तेव्हा मी खूप बैचेन झाले. कारण मी याआधी ऑनस्क्रिन किसिंग सीन कधी केला नाही. त्यामुळे मी या सीनला काढण्यासाठी निर्देशकला सांगितले.

अर्चनाने पुढे सांगितले की, मी खूप विचार केल्यानंतर दीपक यांना फोन केला आणि म्हणाले, मी हा सीन नाही करु शकत. पण मला माहित आहे की, दीपकने या सीनला का हटविले असेल. एकदा शो दरम्यान अर्चनाने अनुपम खैरला विचारले की, तुम्हाला किसिंग सीनला त्यावेळी भिती वाटली का ? कारण तुमचे आधीच लग्न झाले होते.

अभिनेता अनुपम खैर यांनी सांगितले की, मला भिती माझ्या पत्नीची भिती नव्हती. कारण हा सीन करण्यासाठी तु्म्ही तयार नव्हते. त्यामुळे मी दीपकला हा सीन हटविण्यास सांगितिले. त्यावेळी अनुपम खैर ‘द कपिल शर्मा’ च्या शो मध्ये आगामी चित्रपट न ‘डे: जस्टिस डेलिवर्ड’ चा प्रचार करायला आले होते.

आरोग्यविषयक वृत्त

फिट राहण्यासाठी दीपिकाचा नवीन फंडा

हाताला ६ बोटे असणे असते फायद्याचे

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘गुगल मॅप्स’ आणणार नवीन ‘अ‍ॅप’

कॅन्सरच्या मोठ्या सामन्यानंतर सोनाली घेतेय आता हा ‘उपचार’

 

You might also like