‘कपिल शर्मा शो’ मधील अर्चना पूरन सिंहचे ‘भाईजान’ सलमानबाबत मोठं वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अर्चना पूरन सिंह सध्या ‘कपिल शर्मा शो’ मध्ये जज ची भूमिता साकारत आहे. नवजोत सिंह सिद्धू गेल्यानंतर आता अर्चना पूरन सिंहने या शोमध्ये एन्ट्री केली आहे. या शोचे प्रोड्यूसर सलमान खान आहे. नुकताच अर्चनाने खुलासा केला की, दूसऱ्यांपेक्षा जास्त स्वतःची खिल्ली उडविणाऱ्या स्टारमध्ये सगळ्यात पुढे सलमान खान आहे. सलमान स्वतःची खिल्ली उडवित असतो.

अर्चना पूरन सिंहने एका मुलाखतीत सांगितले की, इंडस्ट्रीमध्ये असे काही लोक आहेत. जे स्वतः वर दुसऱ्यापेक्षा जास्त हसतात. सलमान खान आपल्या चित्रपटांवर अनेक जोक करत असतो आणि खूप हसत असतो. यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेता अनिल कपूरचेही नाव सामिल आहे. जे स्वतःवर जोक करतात आणि खूप हसत असतात.

यानंतर त्यांनी अभिनेता सोहेल खानचे ही नाव घेतले. त्या पुढे म्हणाल्या की, सोहेल सुद्धा आपल्या चित्रपटासाठी समाधानी नसतो. तो ही स्वतःच्या चित्रपटांवर जोक करण्यास मागे हटत नाही. नुकताच सलमानचा ‘भारत’ चित्रपट सुपरहिट ठरला. आता तो ‘दबंग ३’ चित्रपटाची शूटिंग करत आहे. चित्रपटाचे पहिले शेड्यूल संपले आहे.

‘दबंग 3’ हा चित्रपट प्रभुदेवा यांनी डायरेक्ट केला आहे. चित्रपटात सलमान खानसोबत सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत असणार आहे. ती रज्जोची भूमिका साकारणार आहे. या व्यतिरिक्त ‘इंशाअल्लाह’ चित्रपटात सलमान पहिल्यांदा आलिया भट्टसोबत काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लिला भन्साळी करणार आहे. सलमान खान २० वर्षानंतर संजय लीला भन्साळी सोबत काम करणार आहे.

१९९९ मध्ये संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट ‘हम दिल दे चुके सनम’ सुपरहिट ठरला होता. सलमान चित्रपटासाठी सध्या आपल्या फिजीकवर खूप काम करत आहे. मागील काही दिवसांपासून सलमान आपल्या जीमचे व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत आहे. सलमानचे म्हणणे आहे की, त्याला वजन कमी करायचे आहे आणि पुन्हा वाढवायचे आहे.

आरोग्य विषयक वृत्त

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक