तिरंदाजीत दोन्ही भारतीय संघांना रौप्य

जकार्ता : वृत्तसंस्था

आशियाई स्पर्धेमध्ये तिरंदाजीच्या सांघिक प्रकारात भारतीय महिला व पुरुष संघाला रौप्य पदक प्राप्त झाले आहे. अटीतटीच्या लढतीत भारतीय पुरुष आणि महिलांना दक्षिण कोरियाकडून निसटता पराभव सहन करावा लागल्याने दोन्ही संघांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

आशियाई क्रीडा स्पर्धांत तिरंदाजीच्या कंपाऊंड प्रकारात भारताच्या महिला संघांपाठोपाठ पुरुष संघानेही रौप्यपदकाची कमाई केली. शूटआऊटपर्यंत ताणलेल्या पुरुषांच्या लढतीत दक्षिण कोरियाने बाजी मारत ‘सुवर्णपदक जिंकले. शूट ऑफमध्येही दोन्ही संघांचे समान गुण झाले होते, मात्र कोरियाच्या खेळाडूंनी लक्ष्याच्या जवळ अधिक मारा केल्यामुळे त्यांना विजते पदक प्रदान करण्यात आले.

[amazon_link asins=’B075T7HQ81,B002DYIZH6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’97575e77-ab57-11e8-964e-31ddba0dc01b’]

पुरुषांच्या चुरशीच्या लढतीत रजत चौहान, अमन सैनी व अभिषेक वर्मा यांनी सर्वस्व पणाला लावले. भारताने पहिला सेट ६०-५६ असा जिंकला. कोरियन संघाने दुसरा सेट ५८-५४ असा जिंकला. हिंदुस्थानी संघाने तिसरा सेट ५८-५६ असा जिंकून पुन्हा आघाडी घेली. मात्र कोरियन संघाने चौथा सेट ५९-५७ असा जिंकल्याने दोन्ही संघांचे २२९-२२९ असे समान गुण झाले. त्यामुळे लढत शूट ऑफमध्ये गेली अन् तेथेही समान गुण झाले होते. मात्र लक्ष्याच्या अधिक जवळ वेध घेतल्यामुळे कोरियन संघ सुवर्णपदकाचा विजेता ठरला.

महिलांच्या अंतिम लढतीतही भारतीय संघाला दक्षिण कोरियाकिरुद्ध ५९-५७  ५६-५८, ५८-५८ आणि ५५-५८ म्हणजेच २३१-२२८असा निसटता पराभव पत्करावा लागला. मुस्कान किरार, मधुमिता कुमारी, ज्योती केनम या तिघींनी या स्पर्धेची शानदार कामगिरी  केली, पण अखेरच्या सेटमध्ये त्या मागे पडल्या. महात्वाच्या वेळी गुणांची कमाई करण्यात अपयशी ठरल्याने भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.